मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये किंग्ज ईलेव्हन पंजाबची (Kings XI Punjab) कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. ७ सामन्यांत केवळ एक विजय मिळवताना त्यानी ६ सामने गमावले आहेत. गुणतालिकेत सध्या तळाच्या स्थानी असलेल्या पंजाबला पुनरागमनासाठी एका जोरदार धक्क्याची गरज आहे. आता पंजाबसाठी ती वेळ आली आहे. कारण त्यांचा अत्यंत विस्फोटक फलंदाज तंदुरुस्त झाला असून लवकरच तो मैदानावर झंझावाती खेळी करण्यास येईल. हा अत्यंत धोकादायक फलंदाज म्हणजे ख्रिस गेल (Chris Gayle).यंदा पंजाबच्या फलंदाजीची मदार राहिली ती कर्णधार लोकेश राहुल (Lokesh Rahul) आणि मयांक अगरवाल (Mayank Agarwal) यांच्यावरच राहिली आहे. मात्र आता पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पंजाबसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. आयपीएलमधील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल आता तंदुरुस्त झाला आहे. पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी ही माहिती दिली असून, गेल लवकरच संघातून खेळताना दिसेल, असेही सांगितले आहे. गेलला पोटाच्या विकारामुळे हॉस्पिटलमध्ये उचपार घ्यावे लागले होते.रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध होणाºया सामन्यातून गेल पंजाबकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल आता पूर्णपणे फिट झाला आहे आणि आरसीबीविरुद्ध त्याचे खेळणे जवळपास निश्चित आहे. १५ ऑक्टोबरला रंगणारा हा सामना शारजाहच्या मैदानावर रंगणार आहे. हे मैदान आकाराने लहान असून येथे गेल अत्यंत धोकादायक ठरु शकतो. प्रशिक्षक कुंबळे यांनी सांगितले की, ‘पोटदुखीमुळे गेलला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले होते. यामुळे तो सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळू शकला नाही.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2020: सावधान! अत्यंत स्फोटक फलंदाज झालाय फिट; आरसीबीविरुद्ध मैदानात उतरणार?
IPL 2020: सावधान! अत्यंत स्फोटक फलंदाज झालाय फिट; आरसीबीविरुद्ध मैदानात उतरणार?
IPL 2020 Chris Gayle KXIP: गुणतालिकेत तळाला असलेल्या पंजाबला कामगिरीत सातत्य राखणं आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 3:52 PM