शारजा - सातपैकी सहा सामने गमावून गुणतक्त्यात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबने आज होणाऱ्या लढतीसाठी संघात अनेक बदल केले आहेत. पंजाबच्या संघाने स्पर्धेत आतापर्यंत एकाही सामन्यात न खेळलेल्या ख्रिस गेलला आजच्या लढतीसाठी संघात स्थान दिले आहे. गेलसोबतच मुरुगन अश्विन आणि दीपक हूडा यांना संघात स्थान दिले आहे.
पंजाबला सातपैकी सहा सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आणि प्लेऑफच्या आशा कायम राखण्यासाठी त्यांना कुठल्याही स्थितीत विजय मिळवावा लागेल. किंग्स इलेव्हन पंजाबने स्पर्धेतील एकमेव विजय आरसीबीविरुद्ध मिळविला होता. : किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या आधारावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध (आरसीबी) गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विजयी मार्गावर परतण्यास प्रयत्नशील असेल.
छोटे मैदान ख्रिस गेलसारख्या ह्यसिक्सर किंगह्णसाठी आदर्श ठरू शकते. या ४१ वर्षीय फलंदाजाला पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवणे सोपे होणार नाही, कारण तो अद्याप स्पर्धेत खेळलेला नाही. गेल गेल्या दोन सामन्यात खेळणार होता, पण पोटदुखीमुळे त्याला बाहेर बसावे लागले. आता तो पूर्णपणे फिट असल्यामुळे त्याच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे.
Web Title: IPL 2020, KXIP vs RCB: Universal boss Chris Gayle returns to KXIP for RCB match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.