विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आणखी एक शानदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो म्हणजे लीग क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी २०० सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला आहे. आयपीएलमध्ये १८५ आणि चॅम्पियन्स टी२० लीगमध्ये १५ असे एकुण २०० सामने त्यानेआरसीबीसाठी खेळले आहे.शारजाहतील मैदानात सुरू असलेला त्याचा हा सामना २०० वा सामना आहे. तर त्याखालोखाल महेंद्र सिंह धोनीने १९२ सामने चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळले आहेत. सीएसकेला दोन सत्रात बंदी असल्याने त्यावेळी धोनी रायजींग पुणे सुपर जायंट्स कडून खेळला होता. विराट याने आरसीबीसाठी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरोधात २००८ मध्ये खेळला होता. तर २०१३ मध्ये १०० वा सामना मुंबई इंडियन्स विरोधात खेळला होता. आता आज २०२० मध्ये त्याने आपला २०० वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबविरोधात खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने पाच हजारापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याची कामगिरी इतर खेळाडूंपेक्षा सरस असली तरी त्याच्या संघाला आरसीबीला अद्याप एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2020, KXIP vs RCB : एकाच संघासाठी २०० सामने खेळणारा विराट बनला पहिला खेळाडू
IPL 2020, KXIP vs RCB : एकाच संघासाठी २०० सामने खेळणारा विराट बनला पहिला खेळाडू
IPL 2020 : विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आणखी एक शानदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो म्हणजे लीग क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी २०० सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 9:29 PM