IPL 2020 KXIP vs SRH  Preview : हैदराबाद- पंजाब यांच्यातील निणार्यक लढतीत बाजी कुणाची, पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचे संकट

किंग्स इलेव्हनने दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघांचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी आपली विजयी मोहीम कायम राखण्यास प्रयत्नशील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 06:42 AM2020-10-24T06:42:47+5:302020-10-24T07:00:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 KXIP vs SRH Preview: Who will win in the decisive match between Hyderabad and Punjab? | IPL 2020 KXIP vs SRH  Preview : हैदराबाद- पंजाब यांच्यातील निणार्यक लढतीत बाजी कुणाची, पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचे संकट

IPL 2020 KXIP vs SRH  Preview : हैदराबाद- पंजाब यांच्यातील निणार्यक लढतीत बाजी कुणाची, पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचे संकट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : सलग तीन विजय मिळवत आगेकूच करीत असलेला किंग्स इलेव्हन पंजाब आणि गेल्या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळविणारा सनराजयर्स हैदराबाद संघांदरम्यान इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी आपली विजयी मोहीम कायम राखण्याचे आव्हान आहे.

किंग्स इलेव्हन व सनरायजर्स यांची स्थिती एकसारखी आहे. प्रत्येकी १० सामने खेळणाऱ्या उभय संघांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुणांची नोंद आहे. सरस नेटरनरेटच्या आधारावर हैदराबाद संघ पाचव्या स्थानी आहे तर पंजाब संघ सहाव्या स्थानी आहे. प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी या दोन्ही संघांना उर्वरित सामने जिंकावे लागतील. किंग्स इलेव्हनसाठी स्पर्धेची सुरुवात चांगली झाली नाही, पण त्यांनी गेल्या तीन सामन्यात शानदार कामगिरी केली.

किंग्स इलेव्हनने दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघांचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी आपली विजयी मोहीम कायम राखण्यास प्रयत्नशील आहे.

आमने-सामने : हैदराबाद- पंजाब
सामने - १५
विजय -  हैदराबाद ११, पंजाब ४ 
 
Web Title: IPL 2020 KXIP vs SRH Preview: Who will win in the decisive match between Hyderabad and Punjab?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.