Corona Virus मुळे Indian Premier League ( IPL 2020) UAEत खेळवण्यात येत आहे. कोरोनामुळे क्रिकेटच्या नियमांत बरेच बदल पाहायला मिळत आहे. कोरोनानं सामन्यांपासून श्रीमंतांच्या आयुष्याला शिस्त लावली. कोरोनानं माणसामाणसांतील अंतर वाढवले असले तरी मनानं सर्वांना अधिक एकत्र आणले. त्यामुळेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकं एकमेकांच्या अधिक जवळ आणले. IPL 2020च्या हिंदी कॉमेंट्रीसाठी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) मुंबईत आहे. 19 सप्टेंबरला IPL 2020 चा पहिला सामना खेळला गेला आणि त्या आधीपासून इरफान मुंबईत दाखल झाला आहे. रविवारी त्यानं त्याच्या ट्विटर हँडलवर एक भावनिक फोटो पोस्ट केला आणि त्याला सुरेश रैनानंही लाईक्स केले. IPL 2020 Updates
IPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य
मिचेल स्टार्कच्या पत्नीनं मोडला MS Dhoniचा रेकॉर्ड; जगात पटकावलं अव्वल स्थान
भारताच्या 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयी संघाचा सदस्य असलेल्या इरफाननं 4 जानेवारी 2020 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2017मध्ये त्यानं अखेरचा IPL सामना खेळला होता. त्यानंतर तो समालोचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला. इरफाननं 29 कसोटी, 120 वन डे आणि 24 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. कसोटीत त्याच्या नावावर 1105 धावा व 100 विकेट्स आहेत. ट्वेंटी-20त 172 धावा व 28 विकेट्स, तर वन डेत 1544 धावा व 173 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. IPLमध्येही त्यानं 103 सामन्यांत 1139 धावा आणि 80 विकेट्स घेतल्या आहेत.
सध्या मुंबईत स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन करत असलेल्या इरफाननं रविवारी त्याच्या मुलाचा फोटो पोस्ट केला. इरफान व त्याचा मुलगा इम्रान खान याच्यासोबतच्या व्हिडीओ चॅटचा स्क्रीन शॉट शेअर केला. त्यात त्याचा मुलगा वडिलांना दूर पाहून रडत असल्याचे दिसत आहे आणि हे पाहून इरफानही भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Web Title: IPL 2020 : Long distance relationship; Irfan Pathan post emotional post, see pic
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.