IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी अन् चेन्नई सुपर किंग्स यूएईत लवकर दाखल होणार!

अन्य संघ ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात दाखल होणार आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 02:21 PM2020-07-25T14:21:43+5:302020-07-25T14:22:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Mahendra Singh Dhoni and Chennai Super Kings to arrive in UAE early for IPL | IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी अन् चेन्नई सुपर किंग्स यूएईत लवकर दाखल होणार!

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी अन् चेन्नई सुपर किंग्स यूएईत लवकर दाखल होणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) होणार असल्याची घोषणा झाली अन् सर्वात आधी महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली. जुलै 2019पासून भारताचा माजी कर्णधार धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलमध्ये त्याला खेळताना पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते, परंतु 29 मार्चला होणारी लीग कोरोना व्हायरसमुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. पण, आता आयपीएल 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी एक महिनाआधी आयपीएल संघ संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे दाखल होणार आहे. पण, धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघ त्याआधीच यूएईत दाखल होणार असल्याचे वृत्त Gulf News ने प्रसिद्ध केलं आहे. ( Chennai Super Kings to arrive in UAE early for IPL) 

Gulf Newsला सूत्रांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तीन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्स यूएईत दाखल होणार आहे. येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि कोरोना व्हायरसमुळे बराच कालावधी अॅक्शनपासून दूर राहिलेल्या खेळाडूंना पुन्हा तयारीसाठी लवकर यूएईत दाखल होणार आहोत.'' ( Chennai Super Kings to arrive in UAE early for IPL) 

दरम्यान, आयपीएल होणार हे निश्चित होताच न्यूझीलंड क्रिकेट मंडळ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपापल्या खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. पण, आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा समावेश अनिश्चित आहे. आफ्रिकेचे १० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणे अशक्य आहे. त्यात एबी डिव्हिलियर्स ( RCB), क्विंटन डी'कॉक ( MI) यांचा समावेश आहे.  ( Chennai Super Kings to arrive in UAE early for IPL) 

"क्रिकेट दक्षिण आफ्रिका खेळाडूंना नक्कीच ना हरकत प्रमाणपत्र देईल, परंतु विमान वाहतूक सुरू करणे आमच्या हातात नाही," असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मीडिया मॅनेजर कोकेत्सो गाओफेटोग यांनी सांगितले आहे. भारताप्रमाणे आफ्रिकेलाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. आतापर्यंत तेथे 4.21 लाख कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद आहे आणि फक्त आप्तकालीन परिस्थितीतच प्रवासाला सरकारकडून परवानगी आहे.( Chennai Super Kings to arrive in UAE early for IPL) 

आफ्रिकन खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी न झाल्यास, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स संघांना सर्वाधिक फटका बसू शकतो. दोन्ही संघांत प्रत्येकी 3 आफ्रिकन खेळाडू आहेत. दहा खेळाडूंसाठी आयपीएल फ्रँचायझींनी एकूण 34.6 कोटी रुपये मोजले आहेत. आफ्रिकन खेळाडूंना आयपीएलमध्ये न खेळल्यास 34.6 कोटींचे नुकसान होऊ शकते. 

IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!

केमार रोचनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच बेन स्टोक्सची 'दांडी' गुल! 

140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video

शाब्बास Hima Das! आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक 'कोरोना वॉरियर्स'ना समर्पित!

मुंबई इंडियन्सच्या जेतेपदानंतर टीमसमोरच त्यानं केलं फिल्मी स्टाईल प्रपोज अन्...

Web Title: IPL 2020 : Mahendra Singh Dhoni and Chennai Super Kings to arrive in UAE early for IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.