Join us  

IPL 2020 : मुंबई इंडियन्स अन् KKR ला झटका; खेळाडूंना 7 नव्हे तर 14 दिवसांसाठी व्हावे लागले क्वारंटाईन

IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे, तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 5:20 PM

Open in App
ठळक मुद्दे19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार स्पर्धामहिनाभर आधीच सर्व संघ संयुक्त अऱब अमिराती येथे दाखल

इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे, तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आयपीएलसाठी सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत आणि सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून सरावालाही सुरुवात केली आहे. पण, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांना झटका देणारे वृत्त समोर आले आहे. मुंबई इंडियन्स आणि KKRच्या खेळाडूंना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. 

किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्स आदी संघांचा सराव सुरू

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्ससाठी वेगळा नियम का?दुबई आणि अबु धाबी येथे कोरोना व्हायरस संदर्भात वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे दोन शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी नियमांचे पालन करावे लागत आहे. अबु धाबीत प्रवेश करण्यापूर्वी रॅपिड टेस्ट करून घेणं अनिवार्य आहे, रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाते. अशा कठोर प्रक्रिया सामन्याच्या दिवशी अमलात आणणे अवघडच आहे. त्यामुळे बीसीसीआयनं अजूनही वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. सध्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ वगळता अन्य सहा संघ दुबईतच आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स अबु धाबी येथे आहेत. 

अबु धाबी येथे कोरोना व्हायरससाठीचे नियम कठोर आहेत आणि त्यामुळे मुंबई व कोलकाता संघांना 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे या दोघ संघापेक्षा अन्य संघांना सरावासाठी अधिकचे 7 दिवस मिळत आहेत.  मुंबई इंडियन्सनं बीसीसीआयकडे मध्यस्थीची मागणी केली आहे.  

म्हणूनच वेळापत्रकालाही विलंबशाहजाह ते दुबई अशा प्रवासाला कोणतेही बंधंन नाही. त्यामुळे आयपीएलचा पहिला लेग दुबई आणि शाहजाह येथे खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. आयपीएलचा दुसरा लेग दुबईपासून 130 किलोमीटर दूर असलेल्या अबु धाबीत खेळवण्यात येईल. प्ले ऑफ आणि फायनल ही दुबईत खेळवली जाऊ शकते. येत्या 48 तासांत पुढील निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल आणि हेमांग आमीन यांच्यासह यूएई सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पाडणार आहे. बीसीसीआयनं पहिला लेग दुबईत घेण्याचे ठरवल्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सना त्यांचा बेस दुबईत हलवावा लागेल.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

आशियात अव्वल नंबर; कॅप्टन कोहलीला मिळाली आणखी एक 'गोड' बातमी! 

विराट-अनुष्काच्या गोड बातमीवर बीसीसीआय, आयसीसीच्या हटके शुभेच्छा

विराट-अनुष्का बनणार आई-बाबा; इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचं ट्विट होतंय व्हायरल, पण का?

'विरुष्का'नं दिली गोड बातमी अन् इथे नेटिझन्सनी लगावला मीम्सचा मास्टर स्ट्रोक!  

IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक!

टॅग्स :आयपीएल 2020संयुक्त अरब अमिरातीमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स