IPL 2020 MI vs CSK Latest News: कोरोना व्हायरसच्या संकटात सर्व क्रिकेट चाहत्यांना सुखावणारा हा दिवस... Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाला आज सुरूवात झाली. क्रिकेट चाहते अगदी चातकासारखे या प्रसंगाची वाट पाहत होते. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) या दोन तगड्या संघांमध्ये सलामीचा सामना अगदी थोड्यावेळात सुरू होईल. MI/CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, दोन्ही संघांची Playing XI ( अंतिम 11 खेळाडू) कोण असतील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आजच्या सामन्यासाठी CSKनं तगडी फौज मैदानावर उतरवली आहे.
IPL 2020साठी UAEत दाखल झाल्यानंतर CSK समोर एकामागून एक अडचणी येत गेल्या. सुरुवातीला संघातील दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 11 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले. अर्थात या सर्वांनी आता कोरोनावर मात केली आहे. या संकटामागून एक मोठं संकट CSKसमोर आलं आणि ते संकट म्हणजे संघालीत अनुभवी खेळाडू व उप कर्णधार सुरेश रैना यानं घेतलेली माघार. सुरेश रैना हा IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. IPL मध्येही रैनानं दमदार खेळी केली आहे. त्याच्या नावावर IPLमध्ये एका शतकाचा समावेश आहे. त्यानं 193 सामन्यांत 33.34च्या सरासरीनं 5368 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 38 अर्धशतकांचा समावेश आहे.
या एका धक्क्यातून सारवतो, तोच संघातील अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यानंही वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्यामुळे CSKच्या चमूत चिंतेचे वातावरण होते, पण ज्या संघात महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आहे त्यांनी चिंता करण्याची गोष्ट नाही, हे फ्रँचायझीकडून स्पष्ट करण्यात आले. भज्जीनं IPL मध्ये 160 सामन्यांत 150 विकेट्स घेतल्या आहेत. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या माघारीनंतर ऋतुराज गायकवाड याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु तोही पूर्णपणे बरा न झाल्यानं CSKचे अंतिम 11 खेळाडू कोण असतील, यावर चर्चा सुरू झाली. आज पहिल्या सामन्यात MS Dhoniनं याचं उत्तर दिलं. MI विरुद्ध CSKनं आज तगडा संघ मैदानावर उतरवला आहे.
जाणून घेवूया CSKचे Playing XI ( vs MI)
शेन वॉटसन, फॅब ड्यु प्लेसिस, सॅम कुरन, लुंगी एनगिडी, महेंद्रसिंग धोनी, मुरली विजय, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, दीपक चहर, पीयूष चावला.
Web Title: IPL 2020 MI vs CSK Latest News: Dwayne Bravo will not play in today's match; Chennai Super Kings playing XI against Mumbai Indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.