मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. पण, मुंबई इंडियन्सच्या ( MI) वाट्याला सलामीचा सामना येणं हे त्यांच्यासाठी फार चांगली गोष्ट नक्कीच नाही. दुसरीकडे CSKच्या चमूत तणावाचे वातावरण असले तरी Opening Match खेळायला मिळणे हे शुभसंकेत म्हणावे लागतील. ( IPL 2020 Live Updates, Click here)
सलामीचा सामना मुंबई इंडियन्सच्या वाट्याला आल्यानं चाहते आनंदात असतील, परंतु त्यांच्यासाठी ही गोष्ट चिंता वाढवणारी ठरू शकते. त्यात संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा यंदाची आयपीएल खेळणार नसल्यानं कर्णधार रोहित शर्माचं टेंशन आणखीन वाढलं आहे. मलिंगानं आयपीएलमध्ये 122 सामन्यांत 170 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स त्याच्याच नावावर आहे. त्यानं 19.80च्या सरासरीनं आणि 7.14च्या इकोनॉमीनं ही कामगिरी केली आहे. 2019चे जेतेपद जिंकून देण्यात मलिंगानं महत्त्वाचा वाटा उचलला होता. मुंबई इंडियन्सन त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटीन्सन याची निवड केली आहे. ( IPL 2020 Live Updates, Click here)
MIसाठी चिंताजनक आकडेवारीमुंबई इंडियन्सनं यापूर्वी सहावेळा आयपीएलचा सलामीचा सामना खेळला आहे. त्यात फक्त एकदा मुंबई इंडियन्सला जेतेपद पटकावता आले, तर एकदाच ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकले आहेत. 2009मध्ये मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा आयपीएलचा सलामीचा सामना खेळला अन् त्या पर्वात संघाला 7व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 2012 आणि 2014मध्ये सलामीचा सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 2015मध्ये मात्र त्यांनी जेतेपदाचा चषक उंचावला. 2016 आणि 2018मध्ये त्यांना पाचव्या स्थानापर्यंत मजल मारता आली.
CSKसाठी शुभसंकेतचेन्नई सुपर किंग्स यापूर्वी पाचव्यांदा सलामीचा सामना खेळले. 2009मध्ये त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. 2011मध्ये ते चॅम्पियन ठरले, तर 2012मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2018मध्ये त्यांनी पुन्हा जेतेपद पटकावले, तर 2019मध्ये उपविजेते ठरले.
मुंबई Vs चेन्नई28एकूण सामने17 विजयी मुंबई इंडियन्स11 विजयी चेन्नई
- 2019 च्या सत्रात मुंबईने चारही सामन्यांत विजय मिळविला. त्यात दोन साखळी सामने, एक क्वालिफायर व अंतिम सामन्याचा समावेश होता.
- गतविजेते मुंबई आणि उपविजेते चेन्नई सुपरकिंग्ज या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना अबुधाबी येथे रंगणार आहे.
- भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता ही लढत सुरू होईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार असून, पहिल्यांदाच या अत्यंत लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती नसणार आहे.
- सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पुढील ५३ दिवस रंगणारे आयपीएलचे सामने पाहणे हा क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा विरंगुळा असणार आहे. सोशल मीडियावरही आयपीएलचीच जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020) रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.
चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings Players List )
महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, मुरली विजय, रुतुराज गायकवाड, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन