Join us  

IPL 2020 MI vs CSK Latest News : दीपक चहरची अनोखी 'हॅटट्रिक'; IPLमध्ये असा पराक्रम कुणाला जमला नाही

IPL 2020 MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 19, 2020 8:07 PM

Open in App

IPL 2020 MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरसच्या संकटात IPL 2020 होणार की नाही, याबाबत सर्वच संभ्रमात होते, परंतु आज अखेरीस तो दिवस उजाडला. महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाहून सर्वांना आनंद झाला. या सामन्यात पहिला चेंडू टाकून दीपक चहरनं स्वतःच्या नावावर एक विक्रम नोंदवला.

चहरने कोणता विक्रम केला२०१८ च्या सत्राला सुरुात करताना मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माला चेन्नईच्या दीपक चहरने सलग तीन चेडूवर चकवले. त्यानंतर रोहितने खणखणीत चौकारासह उत्तर दिले. पहिल्या षटकाअखेर मुंबई च्या बिनबाद ५ धावा होत्या.

गेल्या वर्षी २३ मार्चला चेन्नई येथे आरसीबीच्या विराट कोहलीने पहिल्याच चेंडूवर घेतलेल्या एका धावेसह आयपीएलच्या तपपूर्ती सत्राची सुरुवात झाली. चेन्नईच्या दीपक चहरच्या या षटकात पाच धावा निघाल्या.

2020 च्या पर्वातीलही पहिला चेंडू चहरनं टाकला आणि IPLमध्ये सलग तीन पर्व पहिला चेंडू टाकण्याचा विक्रम त्यानं नावावर केला. 

मुंबई इंडियन्सचे Playing XI ( MI XI vs CSK XI)क्विंटन डी'कॉक, किरॉन पोलार्ड, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरव तिवारी, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, राहुल चहर, जसप्रीत बुमराह

CSKचे Playing XI ( vs MI)शेन वॉटसन, फॅब ड्यु प्लेसिस, सॅम कुरन, लुंगी एनगिडी, महेंद्रसिंग धोनी, मुरली विजय, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, दीपक चहर, पीयूष चावला. 

स्लीप ठेवायची की नाही? नाणेफेक जिंकल्यानंतर धोनीनं निर्णय सांगण्यापूर्वी दोन सेकंदाचा कालवधी घेतला. त्याबाबत मुरली विजयनं त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला,''सोशल डिस्टन्सिंगच्या नव्या नियमात स्लीप ठेवू शकतो की नाही, हे मला त्यांना विचारायचे होते. ( धोनी हसला). मी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. रात्री येथे दव प्रभाव टाकू शकतात.''   नाणेफेकीला आलेल्या MS Dhoniनं घेतली रेफरींची फिरकी; विचारलं, स्लीप ठेवायची की नाही!

MI vs CSK Live Score: रोहित शर्माचा पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार

 मुंबई इंडियन्सच्या संघात दोन खेळाडूंचे पदार्पण, सौरभ तिवारीचे पुनरागमन

टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स