IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिला सामना एकतर्फी झाला. CSKच्या गोलंदाजांनी अखेरच्या 6 षटकांत MIच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवून धावगतीवर लगाम लावली. त्यानंतर अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांनी शतकी भागीदारी करून CSKला विजय मिळवून दिला. रोहित शर्माला बाद करून पीयूष चावलानं MIला मोठा धक्का दिला. CSKच्या विजयात मोलाचा हातभार लावणाऱ्या अंबाती रायुडू आणि चावला यांना समालोचक आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याने Pretty Low Profile Cricketer असे संबोधले. त्यानंतर नेटिझन्सनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. (IPL 2020 Live Updates, Click here)
2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान त्यानं रवींद्र जडेजावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यानं हर्षा भोगलेवरही टीका केली होती. आता IPL2020 च्या पहिल्या सामन्यानंतर त्यानं केलेलं ट्विट व्हायरल झालं आहे. त्यानं ट्विट केलं की,''पीयूष चावला आणि अंबाती रायुडू या दोन Pretty Low profile Cricketersला चांगली कामगिरी करताना पाहून आनंद झाला. चावलानं 5 व्या व 16व्या षटकात उत्तम गोलंदाजी केली. रायुडूनं IPLमधील सर्वोत्तम खेळीपैकी एक काल केली.'' ( IPL 2020 Live Updates, Click here)
रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Q de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला साजेशी सुरुवात करून दिली. धोनीनं पाचवं षटक पीयूष चावलाला ( Piyush Chawla) पाचारण केलं आणि त्याच्या गुगलीसमोर रोहित फसला. तो सॅम कुरनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितला 10 चेंडूंत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या. पुढील षटकात क्विंटनही बाद झाला. यावेळी कुरनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो शेन वॉटसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. क्विंटनने 20 चेंडूंत 5 चौकारांसह 33 धावा केल्या.
सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MI चा डाव सावरला. मुंबईने पहिल्या 10 षटकांत 2 बाद 86 धावा केल्या. पण, 11 व्या षटकात MIला तिसरा धक्का बसला. 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजानं त्याला बाद केलं. फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf du Plessis ) सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. तिवारी 31 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार मारून 42 धावांत बाद झाला. त्याच षटकात फॅफनं आणखी एक सुरेख झेल टिपून हार्दिक पांड्याला माघारी पाठवले. हार्दिकने 14 धावा केल्या.
CSKच्या गोलंदाजांनी अखेरच्या 6 षटकांत MIच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवून धावगतीवर लगाम लावली. मुंबई इंडियन्सला ( MI) 20 षटकांत 9 बाद 162 धावांवर समाधान मानावे लागले. लुंगी एनगिडीनं 38 धावांत 3 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं ( 42/2) दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या.
धावांचा पाठलाग करताना CSKचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकांत माघारी परतले. शेन वॉटसन ( 4) आणि मुरली विजय ( 1) यांना अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी पायचीत केले. रायुडू आणि डू प्लेसिसनं तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रायुडू 70 धावांवर असताना कृणाल पांड्यानं त्याचा झेल सोडला. पण, त्याच षटकात राहुल चहरनं स्वतःच्याच गोलंदाजीवर रायुडूचा सुरेख झेल टिपला. रायुडू 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 71 धावांवर माघारी परतला.
फॅफने 42 धावांत अर्धशतक पूर्ण केले. दीड वर्षानंतर मैदानावर उतलेल्या धोनीला पहिल्याच चेंडूंवर पंचांनी बाद दिले. पण, DRSघेत धोनीनं पंचांना निर्णय बदलण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात विजयासाठी 5 धावांची गरज असताना फॅफनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. पुढच्या चेंडूवर चौकार खेचून फॅफनं CSKला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.