IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!

IPL 2020 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीनं संघाची रणनिती अद्याप स्पष्ट केलेली नाही, परंतु तो नक्की कोणता पत्ता कधी खेळेल याचा नेम नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 01:59 PM2020-09-15T13:59:35+5:302020-09-15T14:00:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 MI vs CSK : Will MS Dhoni move up in batting order in Suresh Raina’s absence? | IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!

IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत.  मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना ( Opening Match) होणार आहे. मुंबई इंडियन्स ( MI) पाचव्या जेतेपदासाठी सज्ज आहेत आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांच्यासह सर्व खेळाडूंनी सरावात तुफान फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजी केली आहे. CSKही त्यांना तोडीस तोड देण्यासाठी सज्ज आहेत. CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंही सरावात जोरदार फटकेबाजी केली. त्यात तो आता पहिल्या सामन्यात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे आणि त्यात यश मिळाल्यास रोहित शर्माची झोप नक्की उडेल. 

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?

IPL 2020साठी UAEत दाखल झाल्यानंतर सर्व खेळाडूंना 6 दिवसांच्या सक्तिच्या क्वारंटाईनमध्ये रहावं लागलं आणि त्यानंतर सर्वांनी सरावाला सुरुवात केली. पण, याला CSK अपवाद ठरला. धोनीच्या संघातील दोन खेळाडू ( दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड) आणि सपोर्ट स्टाफमधील 11 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे संघाला 14 दिवस क्वारंटाईन रहावं लागलं. पुन्हा कोरोना चाचणी अन् रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर चेन्नईनं सरावाला सुरुवात केली. पण, चेन्नईसमोरील आव्हान इथेच संपलं नाही... सुरेश रैना ( Suresh Raina) आणि हरभजन सिंग ( Harbhajan Singh) या अनुभवी व महत्त्वाच्या खेळाडूंनी IPL 2020मधून माघार घेतली.
त्यामुळे रैनाच्या जागी मधल्या फळीची जबाबदारी कोण सांभाळेल, ही चिंता CSK चाहत्यांना नक्की सतावत असेल. त्याचं उत्तर MS Dhoniच देऊ शकतो. पण, पहिल्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे.

रैनाच्या अनुपस्थितीत धोनी फलंदाजीला वरच्या क्रमांकावर येण्यासाठी तयार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं तीनवेळा आयपीएल जेतेपद पटकावले आहे. गतवर्षी अगदी तोंडाशी आलेला घास मुंबई इंडियन्सनं हिरावला. यंदा आलेल्या सर्व संकटावर मात करून CSK जेतेपदाचा चौकार मारण्यास सज्ज आहे. रैनानंही IPL 2020त धोनीला तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पाहायला आवडेल असे मत व्यक्त केलं होतं. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही CSKला हाच सल्ला दिला आहे.  

  • सलामीसाठी पर्याय - शेन वॉटसन, फॅफ ड्यु प्लेसिस आणि मुरली विजय; या तिघांपैकी दोघ पहिल्या सामन्यात नक्की सलामीला येतील.
  • तिसऱ्या स्थानासाठी पर्याय - अंबाती रायुडू किंवा महेंद्रसिंग धोनी  
  • चौथ्या क्रमांकासाठी पर्याय - महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा किंवा केदार जाधव  
  • जलदगती गोलंदाजाचा पर्याय - लुंगी एनगिडी/ शार्दूल ठाकूर/ दीपक चहर/ ड्वेन ब्राव्हो
  • फिरकी गोलंदाजांचा पर्याय - रवींद्र जडेजा/ पीयुष चावला/ केदार जाधव  

MI vs CSK Head to Head

  • एकून सामने - 30
  • मुंबई इंडियन्स - 18 विजय              चेन्नईत 8 विजय    मुंबईत 7 विजय    तटस्थ ठिकाणी 5 विजय
  • चेन्नई सुपर किंग्स - 12 विजय        चेन्नईत 2 विजय    मुंबईत 5 विजय    तटस्थ ठिकाणी 5 विजय

चेन्नई सुपर किंग्स Chennai Super Kings Players List (CSK) - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, मुरली विजय, रुतुराज गायकवाड,  इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन 


चेन्नई सुपर किंग्सचं वेळापत्रक ( Chennai Super Kings Schedule in IPL 2020)
19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
22 सप्टेंबर, मंगळवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह
25 सप्टेंबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स,  सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
2 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
4 ऑक्टोबर, रविवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
7 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
13 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
17 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
19 ऑक्टोबर, सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
29 ऑक्टोबर, गुरुवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 नोव्हेंबर, रविवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी

Web Title: IPL 2020 MI vs CSK : Will MS Dhoni move up in batting order in Suresh Raina’s absence?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.