अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या सध्या सुरू असलेल्या सत्रात कामगिरीत सातत्य राखणारे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांदरम्यान रविवारी चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. या लढतीच्या निमित्ताने दिग्गज खेळाडूंदरम्यानची लढत अनुभवाला मिळण्याची शक्यता आहे. उभय संघांचा फलंदाजी क्रम शानदार आहे आणि मधली फळी मजबूत आहे. त्याचप्रमाणे उभय संघांच्या गोलंदाजी आक्रमणामध्ये भेदकता आहे. वेगवान गोलंदाजीचा विचार करता मुंबई इंडियन्सचे पारडे वरचढ भासते. ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह यांच्याकडे अपार अनुभव असून ते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे शिखर धवनवर दिल्ली संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी राहील.मजबूत बाजू
मुंबई । रोहित शर्मासह ईशान किशन, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड शानदार फॉर्मात. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा अनुभव उपयुक्त ठरेल.
दिल्ली । पृथ्वी शॉ, ऋषभ पंत व कर्णधार श्रेयस अय्यर यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा.कमजोर बाजू
मुंबई । रोहित अपयशी ठरला तर मधल्या फळीवर अतिरिक्त दडपण येण्याची शक्यता
दिल्ली । वेगवान गोलंदाजांच्या अपयशामुळे अश्विनवर अतिरिक्त दडपण येण्याची शक्यता.