अबुधाबी : शानदार फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या लढतीत राजस्थान रॉयल्सपुढे खडतर आव्हान राहणार आहे. आपली मोहीम रुळावर आणण्यासाठी राजस्थान संघ अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
शारजाहमध्ये फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर शानदार सुरुवात केल्यानंतर रॉयल्सची दुबई व अबुधाबीमध्ये कामगिरी निराशाजनक ठरली. दुसऱ्या बाजूचा विचार करता मुंबई आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. रॉयल्सच्या खात्यावर चार सामन्यांत दोन विजय व दोन पराभवांसह चार गुण आहेत. जोस बटलर (३ सामने ४७ धावा) आणि जयदेव उनाडकट (४ सामने १ बळी) यांच्या खराब फॉर्मचा संघाला फटका बसला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ त्याला वगळून यशस्वी जयस्वालला संधी देऊ शकतो. गोलंदाजीमध्ये उनाडकट पॉवरप्ले किंवा डेथ ओव्हर्समध्ये अपयशी ठरत आहे. त्यामुळे टॉम कुरेन व जोफ्रा आर्चर यांच्यावर अतिरिक्त दबाव येत आहे. या परिस्थितीत स्मिथ वरुण अॅरोन किंवा कार्तिक त्यागीला संधी देऊ शकतो.
‘स्पर्धेत चांगली सुरुवात केल्यानंतर गेल्या दोन लढतीत आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. टी-२० क्रिकेटमध्ये असे घडते, असे मला वाटते. दोन्ही वेळा प्रतिस्पर्धी संघांनी आम्हाला चकित केले. गेल्या दोन्ही लढतीत मी अपयशी ठरलो. या लढतीसाठी संघात दोन बदल करण्यात येऊ शकतात.’ -स्टीव्ह स्मिथ
वेदर रिपोर्ट-
दिवसाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी ५२ टक्के तर हवेचा वेग १९ किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता.
पीच रिपोर्ट-
तीन सामने प्रथम फलंदाजी करणाºया तर तीन सामने लक्ष्याचा पाठलाग करणाºया संघांनी जिंकले. खेळपट्टीवर वेगवान व फिरकी गोलंदाज यशस्वी ठरले आहेत.
मजबूत बाजू
मुंबई गेल्या दोन सामन्यांत शानदार कामगिरी. कर्णधार रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये. डिकॉकला सूर गवसला. पोलार्ड, ईशान किशन, हार्दिक पांड्या हे मॅचविनर संघात.
राजस्थान कर्णधार स्टीव्ह स्मिथचे कुशल नेतृत्व. संजू सॅमसन व राहुल तेवतियासारख्या फलंदाजांची उपस्थिती. यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता.
कमजोर बाजू
मुंबई मुंबई इंडियन्सने जास्तीत जास्त सामने प्रथम फलंदाजी करीत जिंकले आहेत. आरसीबीविरुद्धच्या लढतीत मुंबईला सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्याचा पाठलाग करताना अपयशी ठरण्याची शक्यता. राजस्थान अष्टपैलू बेन स्टोक्सची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. मधल्या फळीचा कामगिरीत सातत्याचा अभाव.
Web Title: IPL 2020 MI vs RR: Rajasthan Royals to face Mumbai Indians today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.