IPL 2020 MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा शारजाहतही डंका; हैदराबादवर ३४ धावांनी मात

IPL 2020 MI vs SRH: मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत हैदराबादला फार मोठे फटके मारण्याची संधीच दिली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 04:17 AM2020-10-05T04:17:28+5:302020-10-05T06:56:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 MI vs SRH Mumbai Beat Hyderabad by 34 runs | IPL 2020 MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा शारजाहतही डंका; हैदराबादवर ३४ धावांनी मात

IPL 2020 MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा शारजाहतही डंका; हैदराबादवर ३४ धावांनी मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजाह : गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये रविवारी विजयी परंपरा कायम राखली. शारजाह मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. २०९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हैदराबाद संघ ७ बाद १७४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची खेळी करत अपयशी झुंज दिली. मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत हैदराबादला फार मोठे फटके मारण्याची संधीच दिली नाही.

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने हैदराबादच्या डावाची आश्वासक सुरुवात केली. ट्रेंट बोल्टने बेअरस्टोला माघारी धाडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. यानंतर मनीष पांडे आणि वॉर्नर यांनी पुन्हा एकदा भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावणार असे वाटत असतानाच मनीष पांडे जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३० धावांची खेळी केली. यानंतर हैदराबादच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. एकीकडे कर्णधार वॉर्नर फटकेबाजी करत असतानाही केन विलियम्सन आणि प्रियम गर्ग लवकर माघारी फिरले. वॉर्नरने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि जसप्रीत बुमराहने यांनी प्रत्येकी २ तर कृणाल पांड्याने एक बळी घेतला.

त्याआधी, क्विंटन डीकॉकच्ची अर्धशतकी फटकेबाजी आणि डेथ ओव्हरमध्ये पोलार्ड व पांड्या बंधूंनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात २०८ धावांपर्यंत मजल मारली. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत चांगला मारा केला. परंतु अखेरच्या षटकांत मुंबईच्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरले. डीकॉकच्या ६७ धावा हे मुंबईच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

टर्निंग पॉइंट
डिकॉकची अर्धशतकी खेळी, कुणाल पांड्याच्या ४ चेंडूंतील २० धावा.

विनिंग स्ट्रॅटेजी
शारजाहच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा. फलंदाजांना वर्चस्व गाजविण्याची संधी दिली नाही.

सामन्यातील रेकॉर्ड
च्कुणाल पांड्याने सनरायजर्सविरुद्ध रविवारी चार चेंडूत २० धावा ठोकल्या. २९ वर्षांच्या कुणालने ५०० च्या सर्वोच्च ‘स्ट्राईक रेट’ने या धावा करताना सिद्धार्थ कौलच्या षटकात दोन षटकार आणि दोन चौकार मारले.

आयपीएलमध्ये हा विक्रम ठरला आहे. ईशान किशन-डिकॉक जोडीने महत्त्वपूर्ण ७८ धावांची भागीदारी केली.

Web Title: IPL 2020 MI vs SRH Mumbai Beat Hyderabad by 34 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.