Indian Premier Legue ( IPL 2020) च्या 13व्या पर्वात माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) ची सुरुवात निराशाजनक झाली आहे. IPL 2020चा सलामीचा सामना जिंकल्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली ती घसरलीच... CSKला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आणि IPL इतिहासात MS Dhoniचा संघ गुणतालिकेत तळाला गेला, असं कदाचित प्रथमच घडलं असावं. सुरेश रैना ( Suresh Raina) यानं माघार घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची बॅटींग लाईन अप विस्कळीत झाली. MS Dhoniनं मुरली विजय याला सलामीला खेळण्याची संधी दिली. मधल्या फळीतही प्रयोग केले, पण त्याच्या वाट्याला अपयश आले. आज त्यांचा सामना किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) शी होणार आहे. यात माहीचा संघ कमबॅक करतो की नाही, याची सर्वांना उत्सुकता आहे. MI vs SRH Latest News & Live Score
आजही CSKच्या वाट्याला अपयश आल्यास महेंद्रसिंग धोनीला संघाच्या रणनीतीबाबत गांभिर्यानं विचार करावा लागेल. अशात IPL 2020मधील नव्या नियमानुसार CSKला संघात नवा खेळाडू घेता येणार आहे. CSKलाच नव्हे, तर सर्व संघासाठी हा नियम आहे. त्यामुळे IPL 2020च्या मध्यंतरानंतर कदाचित CSK अजिंक्य रहाणेला आपल्या ताफ्यात घेऊ शकतील. ख्रिस लीग व ख्रिस गेल हे पर्यायही आहेत, परंतु CSKच्या परदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण भरलेला असल्यानं अजिंक्य रहाणे याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.MI vs SRH Latest News & Live Score
राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) आपल्या ताफ्यात घेतले. त्यामुळे शिखर धवन ( Shikhar Dhawan) सोबत तो दिल्लीच्या डावाची सुरुवात करेल, असा तर्क लावला गेला. पण, चार सामन्यानंतरही रहाणेला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेलं नाही. दिल्लीनं तीन विजयासह सध्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनिस, रिषभ पंत चांगल्या फॉर्मात आहेत. अशात दिल्ली त्यांचे विनिंग कॉम्बिनेशन बदलण्याची शक्यता फार कमी आहे. रहाणे दोन वेळा मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी उतरला, परंतु तो आर अश्विन आणि पृथ्वी शॉ यांना बदली खेळाडू म्हणून. MI vs SRH Latest News & Live Score
IPL 2020 मध्यंतरानंतर Mid Season Transferला सुरुवात होईल आणि त्यानुसार संघ त्यांना हवा त्या खेळाडूंची देवाण-घेवाण करू शकतील. त्यामुळे CSK सलामीसाठी पर्याय म्हणून अजिंक्यचा विचार करू शकतील. मुरली विजयला संधीचं सोनं करण्यात अपयश आलं आहे.
काय आहे Mid Season Transfer?इंग्लिश प्रीमिअर लीग आणि ला लिगा या प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धांमध्ये Mid Season Transfer ही संकल्पना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर यंदा IPL 2020 मध्येही Mid Season Transfer विंडो असणार आहे. त्यानुसार संघांना त्यांच्या गरजेनुसार व कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर खेळाडूंमध्ये अदलाबदल करता येणार आहे. या नियमात कॅप किंवा अनकॅप खेळाडूंना घेता येणार आहे. पण, कॅप खेळाडू Mid Season Transfer विंडोपर्यंत संघाकडून दोन किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळलेला असावा. अजिंक्यला अजून संधी मिळालेली नाही.
अजिंक्य रहाणेची आयपीएलमधील कामगिरी140 सामने, 3820 धावा, 105* सर्वोत्तम, 2 शतकं व 27 अर्धशतकं, 404 चौकार , 74 षटकार, 55 झेल, 1 विकेट