भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतली. आता तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल 2020) जोरदार फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सहा संघ दुबईत दाखल झाले. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्स ( सीएसके) संघही शुक्रवारी रात्री दुबईत दाखल झाला. चेन्नई ते दुबई या प्रवासात धोनीच्या नम्रपणाचे दर्शन घडवणारा प्रसंग घडला.
कॅप्टन कूल धोनी जगातला सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी त्याचा माज त्याच्या वागणूकीतून कधी दिसला नाही. त्याचे पाय नेहमी जमिनीवरच आहेत. याची अनेकदा प्रचिती आली. चेन्नई ते दुबई प्रवासात धोनीनं इकोनॉमी क्लासमध्ये प्रवाशाला स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली. जॉर्ज असे या व्यक्तीचे नाव असून त्यानं ट्विटवर ही स्टोरी पोस्ट केली. माझे पाय लांब असल्यामुळे मला इकोनॉमी क्लासच्या सीटमध्ये बसण्यास अवघडल्यासारखे होत होते, ते धोनीला कळले आणि त्यानं त्याची बिझनेस क्लासची सीट मला दिली, असे त्या व्यक्तीनं सांगितले.
बीसीसीआयच्या नियामुसार आता सर्व खेळाडू सहा दिवस क्वारंटाईन होणार आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर असलेला फलंदाज आणि धोनी यांच्यात जवळपास 1000 धावांचा फरक आहे. मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड 178.71 स्ट्राईक रेटनं 1276 धावा केल्या आहेत. या विक्रमात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( 199.64 स्ट्राईक रेट अन् 1136 धावा) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( 234.65 स्टाईक रेट अन् 1063 धावा) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. याशिवाय अखेरच्या चार षटकांत सर्वाधिक 136 षटकारांचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्यानंतर पोलार्ड 92 षटकारांसह दुसऱ्या आणि डिव्हिलियर्स ( 83), रोहित ( 78), आंद्रे रसेल यांचा क्रमांक येतो.