IPL 2020: धोनीनं रैनाचा 'तो' विक्रम मोडला; दुसऱ्याच मिनिटाला रैना म्हणाला...

IPL 2020 MS Dhoni Breaks Suresh Rainas Record: धोनीनं विक्रम मोडताच सुरेश रैनाचं ट्विट

By कुणाल गवाणकर | Published: October 2, 2020 07:35 PM2020-10-02T19:35:41+5:302020-10-02T19:39:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 MS Dhoni surpasses Suresh Raina to become most capped player in IPL history | IPL 2020: धोनीनं रैनाचा 'तो' विक्रम मोडला; दुसऱ्याच मिनिटाला रैना म्हणाला...

IPL 2020: धोनीनं रैनाचा 'तो' विक्रम मोडला; दुसऱ्याच मिनिटाला रैना म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई: आयपीएल २०२० मध्ये (IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सामना सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होत आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईत आतापर्यंत ६ आयपीएल सामने झाले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. नाणेफेकीचा कौल धोनीच्या बाजूनं लागला नसला तरीही एक खास विक्रम धोनीच्या नावावर जमा झाला आहे.

महेंद्रसिंह धोनी आज त्याचा आयपीएलमधील १९४ वा सामना खेळत आहे. याआधी धोनीनं सुरेश रैनाच्या १९३ सामन्यात खेळण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आज धोनीनं तो विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे धोनी आणि रैना जवळपास एक दशकभर आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळले आहेत. दोन्ही खेळाडूंनी २००८ पासून चेन्नईसाठी खेळण्यासाठी सुरुवात केली. धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईनं आतापर्यंत १६३ पैकी १०० सामने जिंकले आहेत.

धोनीनं सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम मोडीत काढताच सुरेश रैनानं लगेच एक ट्विट केलं. 'आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम केल्याबद्दल अभिनंदन माही भाई. माझा विक्रम तू मोडलास याचा आनंद आहे. आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा. यंदाची आयपीएल स्पर्धा चेन्नई जिंकेल, अशी खात्री वाटते,' असं रैनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.



२००८ पासून धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत आहे. चेन्नईच्या संघावर दोन वर्षांची (२०१६ आणि २०१७) बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता. त्यानंतर धोनी पुन्हा चेन्नईकडून खेळू लागला. २०१८ मध्ये चेन्नईनं आयपीएल स्पर्धा जिंकला. धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईनं कायमच दमदार आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. चेन्नईनं सर्वच आयपीएल हंगामांमध्ये बाद फेरीत प्रवेश केला आहे. चेन्नईचा संघ आतापर्यंत ८ वेळा अंतिम फेरीत पोहोचला असून तीनदा जेतेपद पटकावलं आहे.

Read in English

Web Title: IPL 2020 MS Dhoni surpasses Suresh Raina to become most capped player in IPL history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.