भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( आयपीएल 2020) सज्ज झाला आहे. मार्चमध्ये होणाऱ्या आयपीएलमधून तो टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आली. ती होणार की नाही, यावरही शंका होती. पण, अखेर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे. धोनी आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या कॅम्पमध्ये दाखल होण्यापूर्वी धोनीनं कोरोना टेस्ट केली आणि त्याचा रिपोर्ट समोर आला आहे.
वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तो रांची येथील फार्महाऊसवर आहे. या काळात धोनी सेंद्रीय शेती करतानाचे वृत्त होते आणि तसे फोटो व व्हिडीओही व्हायरल झाले होते. याच काळात धोनीचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात धोनी सफेद दाढीत दिसत होता आणि त्याचं वजनही वाढल्याचं दिसत होते. पण, आता आयपीएल होणार हे निश्चित झाल्यानंतर धोनीचा नवा लूक समोर आला आहे. यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे खेळवण्यात येणार आहे. आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
केंद्र सरकारनंही परवानगी दिल्यानंतर सर्व फ्रँचायझींनी आपापल्या खेळाडूंना एका ठिकाणी एकत्रित आणण्याची तयारी सुरू केली आहे. माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्सनंही कॅम्प बोलावले आहे. त्यासाठी धोनीनं कोरोना चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे धोनी लवकरच CSKच्या कॅम्पमध्ये दाखल होणार आहे.
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान!
IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना
England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?
विराट कोहलीचा फोटो असलेल्या जाहिरातीवर BCCIची कारवाई; जाणून घ्या नेमकं कारण
Video: वेटलिफ्टरनं उचललं 400 किलो वजन, अन्...; मन घट्ट करून पाहा थरार
England vs Pakistan, 2nd Test : 10 वर्ष, 8 महिने अन् 16 दिवसांनी खेळाडूला मिळाली पुनरागमनाची संधी
ट्वेंटी-20 लीग सुरू होण्यापूर्वी झाला राडा; शाहरुख खानच्या संघाला विशेष 'सूट'? अन्य फ्रँचायझी नाराज