नवी दिल्ली - यावेळी कोणता संघ आयपीएल-2020 चॅम्पिअन ठरेल यावर क्रिकेट प्रेमींमध्ये जबरदस्त चर्चा सुरू आहे. यातच टीम इंडियाचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरनेही आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी मुंबई इंडियन्स संघ आपीएल चॅम्पिअन ठरू शकतो, असे सचिनने एका युट्यूब मुलाखतीत म्हटले आहे.
अबू धाबी येथे शनिवारी चेन्नई सुरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याबरोबरच आयपीएलच्या 13व्या पर्वाला सुरुवात झाली. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघ चार वेळा आयपीएल चॅम्पिअन ठरला आहे.
या यूट्यूब मुलाखतीत सचिन तेंडुलकरभारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रासोबत बोलताना म्हणाला, "निश्चितच मुंबई इंडियन्स, काही शंका आहे का? मी नेहमी सर्वच ठिकाणी निळ्या रंगाच्या जर्सीवर राहिलो आहे. मुंबई आणि इंडियन्स एकत्रित येतात, तेव्हा मुंबई इंडियन्स होते." आकाश चोप्रा म्हणाला, यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघहीदेखील अत्यंत संतुलित दिसत आहे आणि या सत्रात तो मुंबई इंडियन्सला आव्हान देऊ शकतो. यावर सचिन म्हणाला, आयपीएलमधील सर्वच संघ संतुलित आहेत. यामुळे हा वेगाचा खेळ होईल.
सचिन म्हणाला, "आयपीएलमधील प्रत्येक संघ संतुलित आहे आणि क्रिकेटच्या या प्रकारात फार कमी वेळात बरेच काही होऊन जाते. जेव्ह एखादा फलंदाज लवकर फटकेबाजी करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण त्याला सांभाळून खेळण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला देतो. तर जेव्हा एखादा खेळाडू फटके बाजी करायला वेळ लावतो, तेव्हा आपल्याला वाटते, त्याने फटकेबाजी करावी."
क्रिकेटचा हा प्रकार अत्यंत गमतीशीर आहे. यात कोणताही संघ बाजी मारू शकतो. ही स्पर्धा 53 दिवस चालणार आहे. यात अनेक चढ उतारही बघायला मिळतील. मात्र, ज्या संघाकडे स्पीड असेल तो संघ अधिक सामने जिंकेल, असेही सचिन म्हणाला.
आयपीएलच्या या पर्वाचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. मात्र, यावेळी सचिन संघासोबत नाही. पण त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर संघासोबत नेट गोलंदाज म्हणून गेला आहे. सचीन मुंबईसाठी पहिल्या सहा सत्रांत खेळला आहे. मात्र, तो संघात असताना मुंबई इंडियन्स संघ कधीही आयपीएल चॅम्पिअन ठरला नाही.
महत्त्वाच्या बातम्या -
केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य
भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन
धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'
"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी