Join us  

IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं मैदानावर उतरण्यापूर्वी CSKला नमवलं; घेतली मोठी भरारी!

IPL 2020 : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएलमधील ( IPL) सर्वात यशस्वी संघ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 3:28 PM

Open in App
ठळक मुद्देमुंबई इंडियन्स IPLमधील सर्वात यशस्वी संघ आहेMumbai Indians नं 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये जेतेपद पटकावलं आहे

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020 ) 13व्या पर्वाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019 अशी चार जेतेपद नावावर केली आहेत. 19 सप्टेंबरला अबु धाबी येथे मुंबई इंडियन्स ( MI) मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना करण्यासाठी उतरणार आहे. पण, Mumbai Indiansने मैदानावर उतरण्याआधीच Chennai Super Kingsला नमवलं आहे.

मुंबई इंडियन्स कोणाशी व कधी भिडणार, जाणून घ्या रोहित शर्माच्या संघाचं संपूर्ण वेळापत्रक

रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली Mumbai Indians जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. IPLमध्ये सर्वाधिक जेतेपद पटकावणारा Mumbai Indians हा एकमेव संघ आहे. त्यापाठोपाठ Chennai Super Kingsच्या नावावर तीन जेतेपदं आहेत. मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावरही कुरघोडी केली. Instagram वर 50 लाख फॉलोअर्स झालेला Mumbai Indians हा IPLमधील पहिलाच संघ ठरला आहे. इंस्टाग्रामवर मुंबई इंडियन्सचे 50 लाख 36,029 फॉलोअर्स आहेत. 

Indian Premier League मध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या संघांत चेन्नई सुपर किंग्स ( CSK) 48 लाख, 49,929 फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नईनं तीन वेळ आयपीएल जेतेपद नावावर केलं आहे. विराट कोहलीचा ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challangers Bangalore) 40 लाख 81,938 फॉलोअर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दोनवेळचे चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) अनुक्रमे दोन मिलियन व 1.5 मिलियन फॉलोअर्ससह चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांचे  प्रत्येकी 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) ची फॉलोअर्स संख्या सर्वात कमी म्हणजे 1 मिलियन आहे.   

मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020) रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.  

IPL2020: CSKच्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी MS Dhoniचा 'धाडसी' निर्णय; तुम्हीही कराल कौतुक 

युवराज सिंग देणार 'मोठं' सप्राईज; 'सिक्सर किंग'ची चाहत्यांना सुखावणारी बातमी!

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल 2020इन्स्टाग्रामचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकिंग्स इलेव्हन पंजाबसनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्स