इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाच्या तयारीला वेग आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) केंद्र सरकारची परवानगी मिळवल्यानंतर सर्व फ्रँचायझींना आपापल्या खेळाडूंना एका ठिकाणी बोलावण्याची तयारी सुरू केली आहे. यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्यानं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ महिनाभर आधी दाखल होणार आहेत. पण, अजूनही बीसीसीआय आणि फ्रँचायझींसमोर एक अडचण आहे. परदेशी खेळाडूंना आयपीएलसाठी यूएईत घेऊन येण्याचे आव्हान फ्रँचायझींना पेलावे लागणार आहे. त्यात आता चेन्नई सुपर किंग्स (CSK), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. पण, त्याच बातमीनं मुंबई इंडियन्स ( MI) चा कर्णधार रोहित शर्मा याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.
IPL 2020 : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका ठरली; CSK, RCB अन् KKR फ्रँचायझींची चिंता वाढली
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं ( इसीबी) शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. 24 ऑगस्टला ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये रवाना होईल. 4 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका सुरू होईल. तीन ट्वेंटी-20 व तीन वन डे सामन्यांची मालिका 16 सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं 21 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात ग्लेन मॅक्सवेल, नॅथन लियॉन आणि मार्कस स्टॉयनिस हे सहा महिन्यांनंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतील. त्याशिवाय जोश फिलिफ, डॅनिएल सॅम आणि रिली मेरडीथ या युवा खेळाडूंचीही निवड केली आहे.
कोणत्या संघाला सर्वाधिक फटका?
- आयपीएल 2020 साठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळाडूंना सर्वाधिक 86.7 कोटी इतकी रक्कम मिळाली. इंग्लंडच्या 11 खेळाडूंना 43.8 कोटी रुपये मिळाले.
चेन्नई सुपर किंग्स - सॅम कुरन, जोश हेझलवूड, शेन वॉटसन
- दिल्ली कॅपिटल्स - अॅलेक्स करी, जेसन रॉय, मार्कस स्टॉयनिस
- कोलकाता नाइट रायडर्स - पॅट कमिन्स, ग्रीन , गर्नी, इयॉन मॉर्गन, टी बँटन
- किंग्स इलेव्हन पंजाब - ख्रिस जॉर्डन, ग्लेन मॅक्सवेल
- सनरायझर्स हैदराबाद - जॉनी बेअरस्टो, मिचेल मार्शस स्टँनलेक, डेव्हीड वॉर्नर
- राजस्थान रॉयल्स - जोफ्रा आर्चर, जोस बटलर, टॉम कुरन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अँड्य्रू टाय
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - मोईन अली, अॅरोन फिंच, जे. फिलिफ, केन रिचर्डसन
- मुंबई इंडियन्स - कोल्टर नील, ख्रिस लीन.
शेन वॉटसन हा इंग्लंड-ऑस्ट्रेलया मालिकेचा भाग नसल्यानं तो दाखल होईल.
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी कोणती?वरील लिस्टनुसार मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नील कोल्टर नील आणि ख्रिस लीन हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. इंग्लंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडलेल्या 21 सदस्यीय संघात या दोघांनाही स्थान मिळालेले नाही. त्यामुळे हे दोघेही पहिल्या आठवड्यापासून आयपीएलमध्ये खेळतील.
Bowl Out काय असतं रे भाऊ? पाक कर्णधाराकडे नव्हतं उत्तर; इरफान पठाणनं सांगितला किस्सा
पाकिस्तानचा पोपट झाला; 3911 दिवसांनी फलंदाजाला दिली संधी, पण त्याला फोडता आला नाही 'भोपळा'!