Indian Premier League ( IPL 2020) च्या ४९व्या सामन्यानंतर अखेरीस प्ले ऑफसाठी एक संघ पात्र ठरला. चेन्नई सुपर किंग्सचं ( Chennai Super Kings) प्ले ऑफचे आधीच संपुष्टात आले असले तरी त्यांनी गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) विजय मिळवून मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) तिकिट पक्कं केलं. मुंबई इंडियन्सनं ( MI) १६ गुणांसह प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित केलाच होता, पण KKRच्या पराभवानं त्यावर शिक्कामोर्तब केलं. आतापर्यंत चौथ्या स्थानावर चिकटून बसलेल्या KKRची गाडी घसरली आणि आता त्यांना संघर्ष करावा लागत आहे. MIचं स्थान पक्कं झाल्यानंतर आता उर्वरित तीन जागांसाठीची चुरस वाढली आहे. उर्वरित सहा संघांनाही येथे एन्ट्री घेण्याची संधी आहे.
किंग्स इलेव्हन पंजाबः १२ सामने, १२ गुण, नेट रन रेट -०.०४९उर्वरित सामना वि. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सKKRच्या पराभवानं अन्य संघांना संधी दिली आहे आणि KXIP त्यापैकी एक आहे. त्यांनी सलग पाच विजय मिळवून सर्वांना थक्क केले आहे आणि उर्वरित दोन सामने जिंकून ते प्ले ऑफमध्ये सहज प्रवेश करू शकतील. त्यांनी दोनपैकी १ सामना जरी जिंकला तरी १४ गुणांसह ते नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतात. शुक्रवारी राजस्थानविरुद्ध पराभव झाल्यास KXIPला आव्हान कायम ठेवण्यासाठी एक संधी आहे. पण, त्यांनाही मग अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल. सध्या SRHचा नेट रन रेट हा चांगला आहे आणि त्यांनी उर्वरित दोन सामने जिंकल्यास KXIPचे आव्हान संपुष्टात येईल.
राजस्थान रॉयल्सः १२ सामने, १० गुण, नेट रन रेट -०.५०५उर्वरित सामने वि. किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्सRRचा नेट रन रेट -०.५०५ असा आहे आणि त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित दोनी सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागतील. चेन्नई सुपर किंग्सनं फॉर्म कायम राखून पंजाबला पराभूत करण्याचीही प्रतीक्षा त्यांना पाहावी लागेल. शिवाय हैदराबादनं एकपेक्षा अधिक मिळवता कामा नये, याकडेही त्यांना लक्ष ठेवावे लागेल. तरच RR प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतील.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूः १२ सामने, १४ गुण, नेट रन रेट ०.०४८उर्वरित सामना वि. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स RCBनं दोनपैकी एक सामना जिंकला तरी ते प्ले ऑफ तिकिट निश्चित करतील. त्यांनी दोन सामने गमावले तरी नेट रन रेटच्या जोरावर ते प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहू शकतील. त्यासाठी त्यांना अन्य सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल. दोन्ही सामने गमावल्यास त्यांच्या नेट रन रेटवरही परिणाम होईल. त्यामुळे १४ गुणांची कमाई करणाऱ्या अन्य संघांचा नेट रन रेट जास्त राहिल्यास, RCBची डोकेदुखी वाढू शकेल.
दिल्ली कॅपिटल्सः १२ सामने, १४ गुण, नेट रन रेट ०.०३०उर्वरित सामने वि. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू RCBप्रमाणे दिल्ली कॅपिटल्ससाठीची प्ले ऑफचं समिकरण समान असेल. त्यांनाही एक सामना जिंकून प्ले ऑफचं तिकिट पक्कं करता येईल, परंतु दोन्ही सामने गमावल्यास त्यांना नेट रन रेटच्या आधारावर अवलंबून रहावे लागेल.
सनरायझर्स हैदराबादः १२ सामने, १० गुण, नेट रन रेट - ०.३९६उर्वरित सामने वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्सSRHसाठी पात्रता फेरीचं समिकरण सोपं आहे. त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांचा नेट रन रेट हा इतरांपेक्षा चांगला आहे.