अबुधाबी: वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण याने केकेआरच्या विजयात २८ धावात दोन गडी बाद करीत योगदान दिले. तथापि त्याची गोलंदाजी शैली संशयास्पद असल्याचे निरीक्षण मैदानी पंचांनी नोंदवले. ३२ वर्षांच्या सुनीलच्या गोलंदाजीवर बंदी येण्याची शक्यता आहे.
मैदानी पंचानी संशयास्पद शैलीबाबत कारवाई अहवाल तयार केला. नियमानुसार नारायणचे नाव ‘वॉर्निंग लिस्ट’मध्ये टाकण्यात आले असून त्याला सध्या गोलंदाजी करता येणार आहे. पण जर पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत संशय व्यक्त करून पंचांनी आक्षेप नोंदवला, तर आयसीसी नियमांनुसार गोलंदाजीची शैली निकोप असल्याचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत त्याला गोलंदाजी करता येणार नाही, असेही नमूद करण्यात आले.