Join us  

IPL 2020 : फॉर्मात नाही, तरीही रॉबिन उथप्पाने टाकले ख्रिस गेलला मागे

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या रॉबिन उथप्पाने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याला मागे टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 11:43 PM

Open in App

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या रॉबिन उथप्पाने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याला मागे टाकले आहे. रॉबिन उथप्पाने दिल्ली कॅपिटल्स विरोधातील सामन्यात ३२ धावा करताना आयपीएलच्या सर्व सत्रात मिळून ४४९४ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्याया खेळाडूंच्या यादीत तो आता आठव्या क्रमांकावर आहे.

उथप्पाने १८३ सामन्यात ही कामगिरी केली आहे. गेल याच्या आयपीएलमध्ये ४४८४ धावा आहेत. दिल्ली विरोधातील सामन्यात उथप्पाने गेलला मागे टाकले. सध्या ४१ वर्षांचा गेल आजारी असल्याने आतापर्यंत आयपीएलच्या सामन्यात खेळू शकलेला नाही. तर यंदाच्या आयपीएल सत्रात उथप्पा चांगल्या फॉर्ममध्ये नाही. आतापर्यंत... सामन्यात त्याला फक्त... धावा करता आल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाºया खेळाडूंच्या यादीत विराट कोहली (५६६८ धावा) अव्वल स्थानी आहे. त्यानंतर सुरेश रैना (५३६८), रोहित शर्मा (५११४) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. 

या यादीत उथप्पाच्या पुढे डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन,ए.बी. डिव्हिलियर्स, एम.एस. धोनी हे  पुढे आहेत. उथप्पा याने ही कामगिरी मुंबई इंडियन्स, पुण वॉरीयर्स, कोलकाता नाईट रायडर, रॉयल चँलेजर्स बंगलुरू कडून खेळताना केली आहे. 

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्स