Join us  

IPL 2020: वन टू टेन; प्रत्येक स्थानावर लागले दिल्लीचे नाव

2012 व 2013 मध्ये नऊ संघ होते. पूणे वॉरियर्स हा नियमीत संघांपेक्षा एक जादा संघ होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 2:12 PM

Open in App

- ललित झांबरे

राॉयल चॅलेंजर्स बंगलोरला (RCB) मात देत दिल्ली कॕपिटल्सचा (DC) संघ आयपीएल 2020 (IPL 2020) च्या प्लेआॕफसाठी पात्र ठरला आहे. गूणतालिकेत ते आता दुसऱ्या स्थानी आहेत. आयपीएलच्या इतिहासात साखळी सामन्यांअखेर दुसऱ्या स्थानी राहण्याची दिल्लीची ही पहिलीच वेळ आहे. यासह त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील एक अजब विक्रम नोंदवला आहेत. 

13 वर्षांत आयपीएलमध्ये साखळी सामन्यांअखेर पहिल्या ते दहाव्या अशा प्रत्येक स्थानी राहिलेला दिल्ली डेअरडेव्हिल्स हा एकमेव संघ ठरला आहे. साखळी सामन्यांच्या पुढे ते आयपीएलची अंतिम फेरी एकदासुध्दा गाठू शकले नसले तरी साखळी फेरीतील पहिल्या ते शेवटच्या (10) अशा प्रत्येक स्थानी त्यांचे नाव लागले आहे.

आयपीएलमध्ये आठच संघ खेळले जातात तर नवव्या आणि 10 व्या स्थानी ते कसे आले? तर आयपीएलमध्ये केवळ एकदाच 2011 मध्ये 10 संघ खेळले होते. कोची टस्कर्स व पूणे वाॕरियर्स हे दोन जादा संघ होते. त्यावर्षी नेमका दिल्लीचा संघ चार विजयांतून नऊ गुणांसह शेवटच्या म्हणजे 10 व्या स्थानी होता. 

त्यानंतर 2012 व 2013 मध्ये नऊ संघ होते. पूणे वॉरियर्स हा नियमीत संघांपेक्षा एक जादा संघ होता. योगायोगाने 2012 मध्ये नऊ संघात टॉपर राहिलेला हाच दिल्लीचा संघ  2013 मध्ये मात्र तीन विजयांतून सहा गुणांसह शेवटच्या म्हणजे नवव्या स्थानी होता. 2014 मध्ये तर ते फक्त दोनच सामने जिंकू शकले आणि आठ संघात शेवटच्या स्थानी राहिले.  याप्रकारे दिल्लीने 10, 9 आणि 8 ही तळाची तिन्ही स्थानांवर आपले नाव लावले. आता आयपीएलमध्ये नियमीत आठच संघ खेळतात त्यामुळे आयपीएलच्या स्वरुपात मोठे बदल झाल्याशिवाय हा विक्रम दीर्घकाळ दिल्ली डेअरडेव्हिल्स/ कॕपिटल्सच्याच नावावर राहणार आहे. 

दिल्लीचे वन टू टेन स्थान (कंसात गूण) 

प्रथम - 2009 (20)प्रथम - 2012 (22)द्वितीय - 2020 (16)तृतीय - 2019 (18)चौथे - 2008 (15)पाचवे - 2010 (14)सहावे - 2016 (14)सातवे - 2017 (12)आठवे - 2014 (4)आठवे - 2018 (10) नववे - 2013 (6)दहावे - 2011 (9) 

टॅग्स :IPL 2020दिल्ली कॅपिटल्स