- ललित झांबरे
शारजात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुध्द राजस्थान राॕयल्सच्या राहुल तेवतियाच्या वादळी खेळीत त्याने फर्स्ट गिअर ते टॉप गिअर असा गाठलेला वेग आणि एकाच षटकात लगावलेले पाच षटकार ही वैशिष्टय तर आहेतच पण आणखी एक आगळं वेगळ वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे 31 चेंडूत 53 धावांच्या या खेळीत त्याने षटकार तर लगावले सात पण चौकार एकही नव्हता. फक्त षटकारच, नो चौकार अशी ही त्याची आगळीवेगळी खेळी होती.
आयपीएलच्या इतिहासात अशा सहा पेक्षा अधिक फक्त षटकारच असलेल्या आणि एकही चौकार नसलेल्या केवळ पाचच खेळी आहेत. त्या अशा..
7 षटकार- नितीश राणा (मुंबई इंडियन्स)
वि. कोलकाता नाईट रायडर्स, इंदूर, 2017
7 षटकार- संजू सॕमसन (दिल्ली डेअरडेविल्स)
वि. गुजराथ लायन्स, दिल्ली, 2017
7 षटकार- राहुल तेवटिया (राजस्थान राॕयल्स)
वि. किंग्ज इलेव्हन, शारजा
6 षटकार- डेव्हिड मिलर (किंग्ज इलेव्हन)
वि. राजस्थान राॕयल्स, शारजा, 2014
6 षटकार- आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर्स)
वि. दिल्ली कॕपिटल्स, कोलकाता, 2018