Join us  

IPL 2020 : आयपीएलआधी सराव सामने गरजेचे- जाँटी ऱ्होड्स

‘माझ्याारख्या कोचिंग स्टाफकडे खेळाडूंना भावनात्मक आधार देण्याची जबाबदारी आहे. कोरोनामुळे सर्व खेळाडू कुटुंब आणि मित्रमंडळींपासून दूर आहेत.’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 4:56 AM

Open in App

नवी दिल्ली : दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर असलेल्या खेळाडूंसाठी सामना खेळण्यास सज्ज होण्याआधी आयपीएलमध्ये सराव सामने आयोजित करणे गरजेचे असल्याचे मत किंग्स इलेव्हन पंजाबचे क्षेत्ररक्षण कोच जाँटी ºहोड्स यांनी व्यक्त केले.दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतलेले ºहोड्स म्हणाले, ‘माझ्याारख्या कोचिंग स्टाफकडे खेळाडूंना भावनात्मक आधार देण्याची जबाबदारी आहे. कोरोनामुळे सर्व खेळाडू कुटुंब आणि मित्रमंडळींपासून दूर आहेत.’ यूएईत १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी अनेक खेळाडूंनी कुटुंबाला सोबत न नेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या नऊ सत्रांदरम्यान मुंबई इंडियन्ससोबत राहिलेले ºहोड्स यांच्या मते कौशल्याबाबत सर्वच खेळाडू लयीत आहेत, नेट्सवर स्वाभाविक खेळताना दिसतात.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :आयपीएल 2020