मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले ते किंग्ज ईलेव्हन पंजाबने. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल (Lokesh Rahul)असून मयांक अगरवाल (Mayank Agarwal)तिस-या स्थानी आहे. मात्र पंजाबचा संघ या सलामीवीरांवरच जास्त अवलंबून राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या गुणतालिकेत चार पराभवांसह पंजाब संघ तळाला असून आता त्यांना आपल्या सर्वात विस्फोटक फलंदाजाची आठवण झाली आहे. हा फलंदाज म्हणजे युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल.
चार पराभव पत्करल्यानंतर आता संघात बदल होण्याचे संकेत पंजाबचे फलंदाजी प्रशिक्षक वासिम जाफर यांनी दिले आहेत. गेल आणि मुजीब जारदान या दोन्ही खेळाडूंना लवकरच संधी मिळेल आणि प्ले आॅफसाठी सर्व सामने जिंकणे जरुरी बनेल, तेव्हा या खेळाडूंना संधी देण्याचा संघाचा प्रयत्न अजिबात नसल्याचे जाफर म्हणाले.
पाचपैकी चार सामने गमावलेल्या पंजाब संघाचे फलंदाजी प्रशिक्षक जाफर म्हणाले की, ‘आमच्या संघाची आतापर्यंतची वाटचाल निराशाजनक झाली आहे. मात्र यामध्ये बदल होण्यास एक-दोन सामन्यांची आवश्यकता आहे. यासाठी संघात जास्तीत जास्त मॅचविनर खेळाडूंचा समावेश करावा लागेल. त्यानुसार आता लवकरच अंतिम संघातून गेल आणि जारदान खेळताना दिसतील. जेव्हा संघाला सर्व सामने जिंकण्याची आवश्यकता असेल, अशा स्थितीत आम्ही त्यांना मैदानावर उतरवण्यास इच्छुक नाही. त्यामुळेच दोघांनाही आता मैदानावर पाहण्याची शक्यता वाढली आहे.’
गेल सध्या चांगल्या स्थितीत असल्याचे सांगताना जाफर म्हणाले की, ‘वेस्ट इंडिजचा ४१ वर्षीय दिग्गज चांगल्या स्थितीत असून संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यास तो उत्सुक आहे. सरावा सत्रादरम्यान तो चांगल्या स्थितीत असून नेट्समध्येही गेल शानदार फटकेबाजी करत आहे. संघासाठी तो अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असून सर्वांना माहित आहे की, तो काय करु शकतो. धावा काढण्यासाठी तो भुकेला असून आमच्यासाठी ही चांगले संकेत आहेत. केवळ पुढच्या सामन्यासाठीच नाही, तर संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला त्याच्यासारख्या खेळाडूंची आवश्यकता आहे. गेल नक्कीच आपल्या एकट्याच्या जोरावर संघासाठी ४-५ सामने सहजपणे जिंकू शकतो.’
Web Title: IPL 2020: Punjab remembers Chris Gayle after four defeats!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.