मुंबई - Indian Premier League (IPL 2020) मध्ये बुधवारी झालेल्या चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या (Chennai Superkings) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Roders) जबरदस्त खेळ करताना 10 धावांनी बाजी मारली. या विजयाचा शिल्पकार ठरला तो सलामीवीर राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi). यंदाच्या मोसमात मधल्या फळीत खेळल्यानंतर पहिल्यांदाच राहुलला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. ही संधी त्याने साधताना 51 चेंडूंत 81 धावांची धमाकेदार खेळी खेळली. यामुळेच मॅन ऑफ दी मॅचही राहुलच ठरला. सामना झाल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी राहुल जेव्हा गेला, तेव्हा ‘पडद्या’वरचा राहुल बेभान झाला. सोशल मीडीयावरही सध्या हीच चर्चा रंगली आहे.चेन्नईचा पराभव झाल्यानंतर मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राहुल त्रिपाठी गेला, तेव्हा केकेआरचा मालक आणि बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान बेभान झाला. यावेळी शाररुखने ओरडून म्हटले की, ‘राहुल, नाम तो सुना ही होगा!’ याबाबतचा शाहरुखचा एक व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे. पुरस्कार वितरणाचा व्हिडिओही व्हायरल होत असून यामध्ये दिसून येतं की, जेव्हा राहुल त्रिपाठी सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यात येतो तेव्हा पाठीमागून शाहरुख खान जोर जोराने म्हणतोय, ‘राहुल, नाम तो सुना ही होगा!’ शाहरुखच्या या वाक्याने राहुल त्रिपाठीलाही हसू आवरता येत नव्हते.