RCB vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League 2020) गुरुवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) च्या तडाख्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचा पालापाचोळा झाला. KXIPचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) वादळी शतकी खेळी करताना RCBच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर KXIPने 3 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा संपूर्ण संघ 17 षटकांत 109 धावांत माघारी परतला. लोकेश राहुलच्या या वादळी खेळीनंतर राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) केलेलं ट्विट व्हायरल होत आहे. IPL 2020 Updates
IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली
राजस्थान रॉयल्सनं (RR) ट्विट केलं की,''लोकेश राहुल आज अफलातून खेळ केलास... आम्हाला असं वाटतंय की पुढच्या सामन्यात तू विश्रांती करायला हवी. '' किंग्स इलेव्हन पंजाबचा ( KXIP) पुढील सामना 29 सप्टेंबरला RRविरुद्ध आहे. IPL 2020 Updates
लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद
राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडलेराहुलनं शानदार शतक साकारत आज अनेक विक्रम मोडीत काढले. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम राहुलच्या नावावर जमा झाला आहे. हा विक्रम आधी डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. वॉर्नरनं २०१७ मध्ये हैदराबादचं नेतृत्त्व करताना १२६ धावांची खेळी साकारली होती. २०११ मध्ये विरेंद्र सेहवागनं दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना ११९ धावा केल्या होत्या. २०१६ मध्ये आरसीबीचं कर्णधारपद भूषवताना विराट कोहलीनं तीन शतकं (११९ धावा, १०९ धावा, १०८ धावा नाबाद) झळकावली आहेत.
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही आता राहुलकडे आहे. रिषभ पंतनं २०१८ मध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १२८ धावांची खेळी केली होती. पंतचा विक्रम आज राहुलनं मोडीत काढला. पंतनंतर मुरली विजय (चेन्नईकडून खेळताना १२७ धावा), विरेंद्र सेहवाग (पंजाबकडून खेळताना १२२ धावा), पॉल वेल्थॅटी (पंजाबकडून खेळताना नाबाद १२० धावा) यांचा क्रमांक लागतो. IPL 2020 Updates
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळत असताना आणि कर्णधार म्हणून खेळत नसताना शतक झळकावण्याची किमया आतापर्यंत केवळ दोन खेळाडूंना जमली होती. विरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नर यांनाच ही कामगिरी जमली आहे. आता राहुलच्या नावावरही ही कामगिरी जमा झाली आहे. IPL 2020 Updates