शारजाह : कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) संघ सोमवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या( आरसीबी) लढतीत कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने उतरेल.
केकेआर व आरसीबी या दोन्ही संघांची मुख्य अडचण फलंदाजी आहे. केकेआरतर्फे सुनील नारायणच्या स्थानी डावाची सुरुवात करणाऱ्या राहुल त्रिपाठीने सीएसकेविरुद्ध ८१ धावांची खेळी केली, पण पंजाबविरुद्ध मात्र तो अपयशी ठरला. आरसीबीतर्फे सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. अॅरोन फिंच व एबी डिव्हिलियर्स सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल शानदार फॉर्मात आहे. ख्रिस मॉरिसच्या समावेशामुळे गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे.मजबूत बाजूकोलकाता । सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावला. दिनेश कार्तिकला सूर गवसला. डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी. सलामीचा शुभमान गिल हा देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये.बँगलोर । कर्णधार कोहलीला सूर गवसला. वेगवान गोलंदाज व फिरकीपटूही फॉर्मात.कमजोर बाजूकोलकाता । आंदे्र रसेल दुखापतग्रस्त. राणा व मॉर्गन यांना सातत्य राखता आलेले नाही.बँगलोर । देवदत्त पडीक्कलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना सातत्य राखण्यात अपयश.