- स्वदेश घाणेकर
Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाला आज एक आठवडा पूर्ण झाला. 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्या सामन्यानं IPL 2020चा श्रीगणेशा झाला. गतविजेत्या MIला सलामीच्या सामन्यात हार पत्करावी लागली, परंतु त्यानंतर त्यांनी दमदार कमबॅक केले. पण, विजयानं सुरुवात करणाऱ्या CSKची गाडी मात्र पुढील दोन सामन्यांत रुळावरून घसरली. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघानं अनपेक्षित कामगिरी करताना गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले. किंग्स इलेव्हन पंजाबचा ( Kings XI Punjab) कर्णधार लोकेश राहुलचे ( KL Rahul) शतक हे पहिल्या आठवड्यातील कौतुकास पात्र खेळी ठरली.
MI vs CSK
सौरभ तिवारीच्या दमदार खेळाच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 9 बाद 162 धावा उभारल्या, परंतु तिवारीच्या दमदार खेळीचा शेवट फॅफ डू प्लेसिसच्या अप्रतिम झेलनं केला. सीमारेषेवर फॅफनं अफलातून झेल टिपला आणि सामन्याचे चित्र बदलले. त्यानंतर अंबाती रायुडूनं अर्धशतकी खेळी करताना CSKला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
DC vs KXIP
IPL 2020च्या दुसराच सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) 8 बाद 157 धावांचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) मयांक अग्रवालच्या दमदार खेळीच्या जोरावर विजय मिळवेल, असे वाटत होते. पण, मार्कस स्टॉयनिसच्या अखेरच्या षटकानं सामना फिरवला अन् KXIP ला 8 बाद 157 धावांवर समाधान मानावे लागले. सुपर ओव्हरमध्ये कागिसो रबाडानं ( Kagiso Rabada) याने KXIPला दोन धक्के दिले आणि DCने 3 धावांचे आव्हान सहज पार केले. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका बसला आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.
RCB vs SRH
युजवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं SRHच्या तोंडचा घास पळवला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) बाद झाला आणि त्यानंतर SRHचे 8 फलंदाज 32 धावांत माघारी परतले. त्यामुळे RCBच्या 5 बाद 163 धावांचा पाठलाग करताना SRHला सर्वबाद 153 धावांवर समाधान मानावे लागले.
RR vs CSK
शारजात झालेल्या पहिल्याच सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) चे वादळ घोंगावले आणि CSKच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. राजस्थान रॉयल्सनं 7 बाद 216 धावांचा डोंगर उभा केला आणि हे लक्ष्य पेलवण्यात महेंद्रसिंग धोनीचा संघ अपयशी ठरला. CSKला 6 बाद 200 धावा करता आल्या. या सामन्यात MS Dhoni 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानं टीका झाली. अंबाती रायुडूला दुखापतीमुळे या सामन्यात मुकावे लागले.
MI vs KKR
Rohit Sharma च्या 80 धावांच्या वादळी खेळीनं मुंबई इंडियन्सनं ( MI) 5 बाद 195 धावा केल्या. कोलकाता नाइट रायडर्सला 9 बाद 146 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात रोहितनं अनेक विक्रम मोडले.
KXIP vs RCB
विराट कोहली ( Virat Kohli) हा सामना कधीच विसरणार नाही. KXIPचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) 69 चेंडूंत 14 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 132 धावा कुटल्या. त्या जोरावर KXIPने 3 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला. तगड्या फलंदाजांची फौज असलेल्या RCBला 109 धावांत गुंडाळून KXIPने 97 धावांनी विजय साजरा केला. या सामन्यात षटकांची मर्यादा संथ ठेवल्यानं विराटला 12 लाखांचा दंड सुनावण्यात आला.
DC vs CSK
चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) सलग दुसऱ्या पराभावाचा, तर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. CSK फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात अपयशी ठरले. पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी CSKच्या गोलंदाजांची धुलाई केली. 3 बाद 175 धावांचा पाठलाग करताना CSKला 7 बाद 131 धावाच करता आल्या. DCने सांघिक खेळ करत गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली.
पाहा व्हिडीओ...
Web Title: IPL 2020 : Rewind Week 1; Brilliant catches, outstanding knocks and other top moments from the week gone
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.