मुंबई : आज क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे ते संध्याकाळी होणाºया मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या सामन्याकडे. सध्या गुणतालिकेत दिल्ली आणि मुंबई अनुक्रमे पहिल्या व दुसºया स्थानी आहेत. त्यामुळे सहाजिकंच या सामन्यात तुल्यबळ लढाईची मेजवानी मिळणार हे नक्की. दिल्लीने आतापर्यंत ६ सामन्यांतून केवळ एक सामना गमावत गुणतालिकेत अव्वल स्थानी कब्जा केला. मात्र आता गाठ आहे ती गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध, त्यामुळे दिल्लीला आपल्या सर्वच खेळाडूंकडून सर्वोत्तम खेळाची अपेक्षा आहे. त्यातही स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतकडून (Rishabh Pant) संघाला जास्त आशा आहेत. मात्र पंत मुंबईच्या एका गोलंदाजाविरुद्ध नेहमी अडखळतो आणि हीच बाब दिल्लीसाठी चिंतेची ठरत आहे.
गेल्या काही सामन्यांत पंतने दिल्लीसाठी दमदार फलंदाजी केली. परंतु, आता मुंबईविरुद्ध त्याला अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasapreet Bumrah) अडथळा पार करायचा आहे. बुमराहविरुद्ध पंतचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. बुमराहविरुद्ध पंत नेहमी अडखळताना दिसला आहे. बुमराहविरुद्ध फटकेबाजी करण्याच्या नादात पंतने अनेकदा आपली विकेट अक्षरश: फेकली आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत पंतने बुमराहविरुद्ध २५ चेंडू खेळले असून यामध्ये त्याने १०४ च्या स्ट्राईक रेटने केवळ २६ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान पंत चारवेळा बाद झाला आहे. त्यामुळेच आजच्या सामन्यात पंतला जर मोठी खेळी करायची असेल, तर त्याला मुंबईच्या बुमराहविरुद्ध अत्यंत सांभाळून खेळावे लागेल.
दुसरीकडे, बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. त्याने याआधीच्या झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ४ षटकांमध्ये केवळ २० धावा देत ४ बळी मिळवले होते. सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत बुमराह दुसºया स्थानी असून त्याने ६ सामन्यांतून ११ बळी मिळवले आहेत.
Web Title: IPL 2020: Rishabh Pant's record against Mumbai's 'Ya' bowler is very bad!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.