IPL 2020: विजयी षटकारांत रोहित शर्माची आघाडी; मुंबईच्या कर्णधाराची लय भारी कामगिरी

IPL 2020: रोहित शर्मानं तीनवेळा ठोकले आहेत विजयी षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 02:58 PM2020-10-16T14:58:28+5:302020-10-16T14:58:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Rohit Sharma leads in hitting winning sixes | IPL 2020: विजयी षटकारांत रोहित शर्माची आघाडी; मुंबईच्या कर्णधाराची लय भारी कामगिरी

IPL 2020: विजयी षटकारांत रोहित शर्माची आघाडी; मुंबईच्या कर्णधाराची लय भारी कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- ललित झांबरे

आयपीएल 2020 (IPL 2020). मध्ये सहज वाटणारा विजय किंग्ज इलेव्हनने (KXIP)  गुरुवारी कठीण बनवला. नशिब सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर निकोलस पूरनने (Nicolas Pooran)  षटकार लगावला अन्यथा सुपर ओव्हरची वेळ आली असती. रॉयल चॅलेंजर्सलाही (RCB) वाटले नव्हते की सामना अखेरच्या चेंडूपर्यंत जाईल पण 18 व्या व 19 व्या षटकात मिळून फक्त नऊ धावा जमवणाऱ्या किंग्ज इलेव्हनने एकवेळ आरसीबीच्या  आशा जागवल्या होत्या. 

निकोलस पूरनचा षटकार किंग्ज इलेव्हनची पराभवांची मालिका खंडीत करणारा ठरला. या षटकारासह आयपीएलमध्ये सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार लगावणाऱ्या मोजक्या फलंदाजांच्या पंक्तीत तो जाऊन बसला. 

या विजयी षटकारविरांच्या पंक्तीचा नायक आहे रोहित शर्मा (Rohit Sharma). त्याने तब्बल तीन सामने आपल्या षटकाराने  जिंकून दिले आहेत. आयपीएलमध्ये अशा पध्दतीने एकापेक्षा अधिक सामने जिंकून देणारा तो एकमेव आहे. इतर सहा जण आहेत.

ते कोण हे बघू या..

सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार

फलंदाज ----- गोलंदाज ------------------------- वर्ष 

रोहित शर्मा -- मुर्तझा (केकेआर) ----------------2009

रोहित शर्मा -- मुरली कार्तिक (पीडब्ल्युआय) - 2011

अंबाती रायुडू- बालाजी (केकेआर) ------------- 2011

रोहित शर्मा -- ख्रिस्तियन (केकेआर) ------------2012

सौरभ तिवारी- आशीष नेहरा (पीडब्ल्युआय) - 2012

ड्वेन ब्राव्हो --- रजत भाटिया (केकेआर) ------ 2012

एम.एस.धोनी-- अक्षर पटेल (पंजाब) ----------- 2016

मिशेल सँटनर-- बेन स्टोक्स (आरआर)---------- 2019

निकोलस पूरन - यूझवेंद्र चहल (आरसीबी) --- 2020

Web Title: IPL 2020 Rohit Sharma leads in hitting winning sixes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.