इंडियन सुपर लीग 2020 ( आयपीएल 2020) ला सुरुवात व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी अनेक संघांनी सरावालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे आयपीएलचे वारे आणखी जोराने वाहू लागले आहेत. आयपीएलच्या जाहिरातीही झळकत आहेत आणि अशाच एका जाहिरातीती मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंआयपीएल 2020 आम्ही पटकावून शतको, असा दावा केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चार जेतेपदं मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत आणि यंदाही जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये ते आघाडीवर आहेत. आयपीएल 2020ला 29 मार्चपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याने सुरुवात होणार आहे.
IPL 2020 Schedule: IPL 2020 चं संपूर्ण वेळापत्रक आलं होss; बघा, कोण कोणाशी कधी भिडणार!
मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणइ 2019 अशा विषम वर्षांत जेतेपद पटकावले आहे. त्यावरून सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात यंदाचे आयपीएल हे सम वर्षात होत असल्याने मुंबई इंडियन्सचे जिंकण्याचे चान्स कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरून पुन्हा एक जाहिरात तयार करण्यात आली आहे आणि त्यात रोहितनं लॉजिक सांगतले आहे.
या जाहिरातीत एक काका रोहितला झोपेतून उठवताना दिसत आहेत आणि त्याला त्या मुलाची जाहिरात दाखवत आहेत. त्यावरून रोहितनं काकांना समजावले की हे आयपीएलचे 13 वे सत्र आहे आणि तोही विषम अंक आहे. त्यामुळे आम्ही जेतेपद कायम राखू, असा विश्वास रोहितनं काकांना दिला. चार जेतेपद नावावर असूनही मुंबई इंडियन्सला एकदाही जेतेपद कायम राखता आलेले नाही. त्यामुळे यंदा मुंबई इंडियन्सला विक्रम घडवण्याची संधी आहे.
पाहा व्हिडीओ...
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक शर्मा, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.