इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाच्या तयारीला वेग आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) केंद्र सरकारची परवानगी मिळवल्यानंतर सर्व फ्रँचायझींना आपापल्या खेळाडूंना एका ठिकाणी बोलावण्याची तयारी सुरू केली आहे. यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्यानं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ महिनाभर आधी दाखल होणार आहेत. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ( RCB) खेळाडू बंगळुरू येथे दाखल झाले आहेत, तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं सरावाला सुरुवात केली आहे.
Big News : भारताचे दिग्गज क्रिकेटपटू व्हेंटिलेटर सपोर्टवर, गेल्या महिन्यापासून घेतायेत कोरोनावर उपचार
Video : पाकिस्तानी फलंदाज बनला मस्करीचा विषय; स्वतःलाच करून घेतलं 'रन आऊट'!
आयपीएलच्या 13व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यास केंद्र शासनाने औपचारिक मंजुरी प्रदान केली. लीगचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. आयपीएलचे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत शारजा, अबुधाबी आणि दुबईत होणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं त्यासाठी कसून मेहनत घेतली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक 4 जेतेपदं पटकावली आहेत. गतवर्षी त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला नमवून चौथे जेतेपद नावावर केलं होतं. आता यूएईत जेतेपद कायम राखण्याचं त्यांचं लक्ष आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Video : पाकिस्तानी फलंदाज बनला मस्करीचा विषय; स्वतःलाच करून घेतलं 'रन आऊट'!
भाजपाने दिली होती तिकिटाची ऑफर, पण...; कंगनाने सांगितली 'राजकारण की बात'
Independence Day 2020 : व्हॉट अॅन आयडिया सर जी; भाज्यांपासून तयार केला तिरंगा; पाहा फोटो
World Record : ट्वेंटी-20त चार चेंडूंत चार विकेट्स, मिळवला पहिला मान; मलिंगा, रशीद खान यांच्या पंक्तित स्थान
IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल; RCB, CSKचा कमी नाही थाट!
जर्मन कंपनीनं ज्या कामासाठी मागितले 50 लाख, ते काम आपल्या इंजिनियर्सनी केलं दीड लाखात!
Independence Day 2020 : इरफान पठाणच्या एका ट्विटनं जिंकली लाखो मनं; खेळाडूंकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
Web Title: IPL 2020 : Rohit Sharma start practicing; Royal challengers bangalore players arrive for their quarantine in Bengaluru
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.