भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावसकर यांना रोहित शर्माचा पुलचा फटका खूप आवडला. रोहितने हा फटका रविवारी सनराजर्स हैदराबादविरुद्ध खेळला होता. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला या लढतीत मोठी केळी करता आली नाही. तो केवळ ६ धावा काढून संदीप शर्माच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक बेयरस्टोकडे झेल देत माघारी परतला.सुनील गावसकर यांनी आपल्या समालोचनामध्ये रोहित शर्माने या छोट्या खेळीदरम्यान खेळलेल्या फ्रंट फुट पुलच्या फटक्याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, ‘रोहितने हा फटका खेळत भारतीय फलंदाजांना नवी दिशा दाखविली. फ्रंट फुटवर आपल्या वजनाचा योग्य वापर करीत त्याने हा फटका शानदार पद्धतीने खेळला.’ गावसकर यांना हा फटका एवढा आवडला की त्यांनी दिवसातील दुसऱ्या सामन्यादरम्यानही त्याची आठवण केली. सीएसकेचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर पंजाबच्या मयंक अग्रवालने खेळलेल्या पुलच्या फटक्याने गावसकर यांना रोहितच्या पुलच्या फटक्याची आठवण झाली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2020: रोहितचा पुलचा फटका नवी दिशा देणारा; सुनील गावसकर खूश
IPL 2020: रोहितचा पुलचा फटका नवी दिशा देणारा; सुनील गावसकर खूश
IPL 2020: सुनील गावसकर यांनी आपल्या समालोचनामध्ये रोहित शर्माने या छोट्या खेळीदरम्यान खेळलेल्या फ्रंट फुट पुलच्या फटक्याचा विशेष उल्लेख केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 4:08 AM