Join us  

IPL 2020, RR vs SRH: वॉर्नरला सावध रहावे लागेल, आर्चरच्या नवव्या चेंडूवर; पण का?

IPL Match RR vs SRH News: या दोन्ही खेळाडूंमध्ये आज 9व्या चेडूचा थरार पाहण्यास मिळेल. त्यास कारणही तसेच आहे. चाहत्यांना मोठा प्रश्न पडला आहे तो आर्चरच्या नवव्या चेंडूचा. नेमकं काय आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 2:52 PM

Open in App

मुंबई : Indian Premier League (IPL 2020) च्या यंदाच्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) यांची गाडी अडखळत आहे. दोन्ही संघ आज आमने सामने येणार असून प्ले ऑफ प्रवेशाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्यासाठी दोघांनाही आज विजय मिळवणे अनिवार्य आहे. त्यामुळेच आत अत्यंत अटीतटीची लढत होईल हे नक्की.

त्यातही राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Acher) आणि हैदराबादच्या फलंदाजीचा कणा असलेला डेव्हिड वॉर्नर (David Warner)  यांच्यातील लढत पाहण्याची संधीही चाहत्यांना मिळेल. वॉर्नर काही सामन्यांपासून आर्चरविरुद्ध चाचपडताना दिसला असून त्याला आर्चरच्या नवव्या चेंडूपासून सावध रहावे लागेल. राजस्थानच्या गोलंदाजीवर नजर टाकल्यास आर्चरची यंदाची कामगिरी तुफान झाली आहे. त्याने भल्याभल्या फलंदाजांना आपल्या वेगाने आणि अचूकतेने घाम फोडला आहे. त्यातही त्याने वॉर्नरला आपला हक्काच बकराच बनवला आहे.

या दोन्ही खेळाडूंमध्ये आज 9व्या चेडूचा थरार पाहण्यास मिळेल. त्यास कारणही तसेच आहे. चाहत्यांना मोठा प्रश्न पडला आहे तो आर्चरच्या नवव्या चेंडूचा. नेमकं काय आहे. आर्चरचा हा नववा चेंडू याचा शोध अनेकजण घेत आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक नवव्या चेंडूवर आर्चरने वॉर्नरला तंबूची वाट दाखवली आहे आणि त्यामुळेच वॉर्नरला अत्यंत सावध होऊन खेळावे लागेल. टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत वॉर्नरने आर्चरविरुद्ध २७ चेंडू खेळले असून यामध्ये त्याने केवळ २३ धावाच केल्या आहेत. तसेच, यादरम्यान तो ३ वेळा बादही झाला आहे. याचाच अर्थ प्रत्येक ९व्या चेंडूवर आर्चरने वॉर्नरला माघारी धाडले आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही याआधीच्या सामन्यात आर्चरने आपल्या तुफान वेगाने वॉर्नरला बोल्ड केले होते. त्यामुळेच आजच्या सामन्यातही या दोन स्टार खेळाडूंमधील तुंबळ युद्ध पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. 

टॅग्स :IPL 2020डेव्हिड वॉर्नरजोफ्रा आर्चरसनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्स