Join us  

IPL 2020: आरसीबीचे आव्हान संपल्याने कुजबुज

प्रथमच जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरण्यात सज्ज आहोत, असेही वाटले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2020 1:32 AM

Open in App

आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे प्रसिद्ध कवी टी.एस. इलियट यांच्या काव्याप्रमाणे केवळ दणका देण्यात अपयशी ठरल्याची कुजबूज सुरू झाली.  यंदाच्या पर्वात पहिल्या १० सामन्यांपैकी सातमध्ये विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. प्रथमच जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरण्यात सज्ज आहोत, असेही वाटले. 

२१ ऑक्टोबरला केकेआरला ८ गडी राखून हरविल्यानंतर आम्ही १६ दिवसांमध्ये सलग पाच सामने गमावले. या पाचही सामन्यात आम्ही नाणेफेक गमावली आणि प्रतिस्पर्धी संघाने आम्हाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. आम्हाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या पाचही सामन्यात आम्ही पराभूत झालो. 

सनरायझर्स हैदराबादविरुद्धची शुक्रवारी खेळल्या गेलेला एलिमिनेटर खडतर होता. या संथ खेळपट्टीवर १४० ही धावसंख्या पुरेशी ठरेल, असे आम्हाला वाटले, पण आम्हाला केवळ १३१ पर्यंत मजल मारता आली. आमचे फिरकीपटू यजुवेंद्र चहल, वाशिंग्टन सुंदर व ॲडम झम्पा यांनी शानदार मारा करीत आम्हाला लढतीत कायम राखले. एकवेळ या लढतीत हैदराबाद संघ दडपणाखाली असल्याचे दिसले, पण दोन आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर हैदराबाद संघाला पैलतीर गाठून  दिला.  विलियम्सन व होल्डर यांनी शानदार खेळ केला. पराभवानंतर टीकेला सामोरे जावे लागते, हे नवे नाही. व्यावसायिक खेळामध्ये हे ठरलेले आहे. फलंदाजीमध्ये आमची मधली फळी आणि डेथ ओव्हर्सची गोलंदाजी यामध्ये संघर्ष करावा लागला. 

२०१६ नंतर आम्ही प्रथमच प्ले-ऑफ गाठण्यात यशस्वी ठरलो. प्रशिक्षक सायमन कॅटिचच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी चांगली मेहनत घेतली. आम्हाला आणखी काही विभागात सुधारणा करण्याची गरज आहे. २०२१ मध्ये आम्ही दमदार आव्हानासह परतू असा मला विश्वास आहे. सर्वकाही सुरळीत असेल तर चार महिन्यानंतर पुन्हा आयपीएल स्पर्धा होईल.वैयक्तिक विचार करता या स्पर्धेत सहभागी होणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. हा सर्वांसाठी खडतर तर अनेकासांठी आव्हानात्मक कालखंड  आहे. त्यामुळे सुरक्षित राहा. धन्यवाद. (टीसीएम)

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरIPL 2020