Indian Premier League ( IPL 2020) मध्ये गुरुवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला किंग्स इलेव्हन पंजाबकडून ( KXIP) पराभव पत्करावा लागला. ख्रिस गेल ( Chris Gayle) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) यांच्या अर्धशतकाच्या आणि मयांक अग्रवालच्या ४५ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण संथ होत असलेल्या खेळपट्टीवर बंगळुरूला निर्धारीत २० षटकांत १७१ धावा करता आल्या. बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४८ के्ल्या. बंगळुरूने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी जोरदार सुरुवात करून दिली. दोघांनीही बंगळुरूच्या गोलंदाजांना झोडपून काढले. मयांक आणि राहुलने पॉवर प्लेच्या पहिल्या ६ षटकांत ५६ धावा फटकावल्या. युझवेंद्र चहलने मयांक अग्रवालला बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. मयांकने २५ चेंडून ४५ धावा फटकावल्या.
मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि ख्रिस गेलने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. गेल (५३) आणि राहुलने (६१) आपापली अर्धशतके पूर्ण करत पंजाबला विजयासमिप नेले. पंजाबला विजयासाठी एक धाव हवी असताना गेल धावचीत झाला. मात्र तोपर्यंत पंजाबचा विजय निश्चित झाला होता. शेवटी सामन्यातील शेवटच्या चेंडूवर निकोलस पूरनने खणखणीत षटकार ठोकत पंजाबला विजय मिळवून दिला.
पंजाबच्या या विजयानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान ( Salman Khan) याचं २०१४ चे ट्विट व्हायरल झालं. त्यात त्यानं, झिंटा टीम जिंकली का?. असा प्रश्न विचारला होता.