Join us  

IPL 2020 Schedule: CSKची सलामीलाच मुंबई इंडियन्सशी गाठ; त्यानंतर कसा असेल त्यांचा प्रवास?

इंडियन प्रीमिअर लीग 2020च्या पहिल्याच सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गतउपविजेता चेन्नई सुपर किंग्स हे दोन तगडे संघ भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 12:08 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग 2020च्या पहिल्याच सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गतउपविजेता चेन्नई सुपर किंग्स हे दोन तगडे संघ भिडणार आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासाठी यंदाची आयपीएल स्पर्धा ही खास आहे. त्याला टीम इंडियात पुनरागमन करायचे असल्यास आयपीएल 2020मध्ये दमदार कामगिरी करावी लागणार आहे. त्यामुळे आयपीएल 2020मध्ये धोनीच्या कामगिरीवर निवड समितीसह सर्वांचे लक्ष लागले आहे. 29 मार्चला चेन्नई पहिला सामना मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर 2 एप्रिलला पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होईल.

इंग्लंडमध्ये गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. सुरुवातीला त्यानं विश्रांती घेतल्याची चर्चा होती, परंतु त्याचे पुनरागमन वारंवार लांबणीवर पडत असल्यानं निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. निवड समिती प्रमुखे एमएसके प्रसाद आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलनंतर धोनीच्या पुढील वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे ही आयपीएल धोनीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, मुरली विजय, रुतुराज गायकवाड, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन 

चेन्नई सुपर किंग्सजे संपूर्ण वेळापत्रकवि. मुंबई इंडियन्स - 29 मार्च ( अवे) आणि 24 एप्रिल ( होम)वि. राजस्थान रॉयल्स - 2 एप्रिल ( होम) आणि 4 मे (अवे)वि. कोलकाता नाईट रायडर्स - 6 एप्रिल ( अवे) आणि 7 मे ( होम)वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 11 एप्रिल ( होम) आणि 17 एप्रिल ( अवे)वि. सनरायझर्स हैदराबाद - 19 एप्रिल ( होम) आणि 30 एप्रिल ( अवे)वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 27 एप्रिल ( होम) आणि 14 मे ( अवे)वि. दिल्ली कॅपिटल्स - 13 एप्रिल ( अवे) आणि 10 मे ( होम) 

सनरायझर्स हैदराबाद पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना 

KKR, RCBनं जाहीर केलं त्यांचं संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, तेंडुलकरच्या बर्थ डेला कोणाशी भिडणार?

टॅग्स :आयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्सकिंग्ज इलेव्हन पंजाब