इंडियन प्रीमिअर लीग 2020 चे वेळापत्रक जाहीर झाले. आयपीएलनं याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी प्रमुख संघांनी आपापलं वेळापत्रक जाहीर करून टाकले. त्यानुसार चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात उद्घाटनीय सामना होणार आहे. 2016च्या आयपीएल विजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघानंही आपलं वेळापत्रक जाहीर केलं आणि त्यांना पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना
सनरायझर्स हैदराबाद संघाने 2017 आणि 2019च्या मोसमात प्ले ऑफपर्यंत मजल मारली होती. त्यांनी 2018मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यंदाच्या मोसमात जेतेपद पटकावण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांनी यंदाच्या लिलावात सात खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. सनरायझर्स हैदराबाद 1 एप्रिलला त्यांच्या मोहीमेला सुरुवात करतील. त्यांचा पहिला मुकाबला मुंबई इंडियन्सशी होणार आहे. त्यानंतर ते मोहाली, बंगळुरु येथे अनुक्रमे 4 व 7 एप्रिलला खेळतील. त्यांतर पुन्हा घरच्या मैदानावर 12 एप्रिलला ते राजस्थान रॉयल्सचा सामना करतील. 19 आणि 21 एप्रिलला अनुक्रमे चेन्नई आणि जयपूर येथे सनरायझर्स हैदराबाद खेळण्यासाठी जाणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद - अभिषेश शर्मा, बसील थम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, डेव्हीड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धीमान सहा, पियाम गर्ग, विराट सिंग, मिचेल मार्श, फॅबीयन अॅलन, संदीप बवानका, संजय यादव, अब्दुल समद
सनरायझर्स हैदराबादचं संपूर्ण वेळापत्रक
वि. मुंबई इंडियन्स - 1 एप्रिल ( होम) आणि 9 मे ( अवे)
वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 4 एप्रिल ( अवे) आणि 12 मे ( होम)
वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 7 एप्रिल ( अवे) आणि 5 मे ( होम)
वि. राजस्थान रॉयल्स - 12 एप्रिल ( होम) आणि 21 एप्रिल ( अवे)
वि. कोलकाता नाईट रायडर्स - 16 एप्रिल ( होम) आणि 15 मे ( अवे)
वि. चेन्नई सुपर किंग्स - 19 एप्रिल ( अवे) आणि 30 एप्रिल ( होम)
वि. दिल्ली कॅपिटल्स - 26 एप्रिल ( होम) आणि 3 मे ( अवे)
KKR, RCBनं जाहीर केलं त्यांचं संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, तेंडुलकरच्या बर्थ डेला कोणाशी भिडणार?
Web Title: IPL 2020 Schedule: Full Schedule/Fixtures, Venues of Sunrisers Hyderabad (SRH)
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.