आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) अखेर सोमवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसा हा निर्णय आधीच ठरला होता, फक्त त्यासाठी आयसीसीनं वेळ घेतला अन् अखेर ती औपचारिकता पूर्ण केली. आयसीसीच्या या निर्णयानं जगभरातील क्रिकेट चाहते दुःखावले असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) प्रचंड आनंद झाला असेल हे नक्की.. आयसीसीचा हा निर्णय त्यांनाही माहित होता, फक्त ते आयसीसीच्या मुखातून हा निर्णय यायची वाट पाहत होते. त्यामुळे आता बीसीसीआयचा इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) खेळवण्याचा मार्ग मोकळा झालाय, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. पण, खरंच आयपीएलच्या 13व्या मोसमाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झालेत का? ( IPL 2020 set to be held from September 26 in UAE )
T20 World Cup बाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; BCCIला दिलासा, पण...
ICC नं पुढील तीन वर्ल्ड कपच्या तारखा केल्या जाहीर; पण बीसीसीआयसमोर टाकलीय 'गुगली'!
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय आयसीसीनं जाहीर केला. हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे. 16 देशांतील संघांना एका देशात आणणं, खेळाडू व त्यांच्या सपोर्ट स्टाफची सुरक्षितता, या गोष्टींना प्राधान्य देताना हा निर्णय घेतल्याचे आयसीसीनं सोमवारी स्पष्ट केलं. त्यामुळे आता बीसीसीआय आयपीएल खेळवण्यासाठी मोकळा झाला आहे. फक्त ही लीग भारतात खेळवायची की संयुक्त अरब अमिराती ( यूएई) हा निर्णय होणं बाकी आहे. बीसीसीआयचे प्राधान्य यूएईलाच असल्यानं सर्व फ्रँचायझींनी प्रायाव्हेट जेट भाड्यानं घेण्याचं ठरवले आहे. (IPL 2020 set to be held from September 26 in UAE )
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 कोटी 48 लाखांच्या घरात पोहोचला आहे. अशा परिस्थितीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्याचा धोका पत्करणे म्हणजे संकटाला बोलावणेच. त्यात ऑस्ट्रेलियातील कोरोना रुग्णांची संख्या ही 12428 आणि त्यापैकी 8444 रुग्ण बरेही झाले. अशा परिस्थितीत तेथे अन्य देशांतील खेळाडूंना बोलावून ही संख्या आणखी वाढवण्याचा धोका कशाला पत्करायचा? म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारनं यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यास असमर्थता दर्शवली आणि ती योग्यच आहे. ( IPL 2020 set to be held from September 26 in UAE )
कोरोना रुग्णांच्या देशांत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 54,917 इतका झाला आहे. त्यामुळे भारतातही आयपीएल होणं अवघडचं आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भारतीय महिला संघानं इंग्लंड दौरा रद्द केल्याची चर्चा आहे. इंग्लंड सरकारनंच तसं त्यांना कळवलं आहे. त्यामुळेच आता बीसीसीआयनं आयपीएलसाठी यूएईचा पर्याय शोधला आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत येथील कोरोना रुग्णांची संख्या ही 57,193 इतकी आहे आणि त्यापैकी 49,621 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच 7232 एवढे रुग्ण सध्या तेथे अॅक्टीव्ह आहेत.( IPL 2020 set to be held from September 26 in UAE )
तरीही बीसीसीआयला आपल्या आठ संघांना तेथे नेऊन खेळायचे आहे. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा फटका बसणार आहे आणि एवढं मोठं नुकसान बीसीसीआयला परवडणारं नक्कीच नाही. त्यामुळेच जगातील श्रीमंत संघटना असलेल्या बीसीसीआयनं आधी आशिया चषक स्थगित करण्यास भाग पाडले अन् ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाला आहे. ( IPL 2020 set to be held from September 26 in UAE )
बीसीसीआयची आता खरी कसोटी!देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता आता बीसीसीआयला केंद्राची परवानगी मिळवणं गरजेचं आहे. आता त्यांचा खरा कस लागणार आहे. 8 संघांतील जवळपास 100 भारतीय खेळाडू अन् 50-55 सपोर्ट स्टाफ असा सर्व गोतावळा घेऊन यूएईत जाण्याची परवानगी बीसीसीआयला मिळवावी लागेल. अर्थात बीसीसीआयच्या सचिवपती जय शाह असल्यानं त्यात अडचण येईल असं वाटत नाही. जय शाह हे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचे सुपूत्र आहेत. पण, केंद्र सरकार खेळाडूंच्या जीवाशी खेळण्याची परवानगी बीसीसीआयला देईल का?