इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्यानंतर आता उत्सुकता लागलीय की खऱ्या अॅक्शनची. PTIने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2020संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे होणार असून 19 सप्टेंबरला पहिला सामना रंगणार आहे. यंदाची आयपीएल यूएईत होणार असल्याचे आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी आधीच जाहीर केलं होतं. आता पुढील आठवड्यात संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. (IPL set to start on September 19, final on November 8)
आतापर्यंत आयपीएल 26 सप्टेंबरला होईल, अशी चर्चा होती. पण, PTIला पटेल यांनी सांगितलं की ही स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरू होणार असून 8 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. 3 डिसेंबरला कसोटी मालिका सुरू होणार असून त्यापूर्वी टीम इंडियाला 14 दिवस क्वारंटाईन होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.(IPL set to start on September 19, final on November 8)
''आयपीएल 19 सप्टेंबरला सुरू होण्याची शक्यता अधिक आहे आणि 8 नोव्हेंबर ( रविवारी) अंतिम सामना होईल. आयपीएलसाठी 51 दिवस आम्हाला मिळत आहेत आणि फ्रँचायझी व ब्रॉडकास्टर अन् अन्य भागधारकही या तारखांवर समाधानी होतील,''असे पटेल यांनी PTIला सांगितले. ते पुढे म्हणाले,''51 दिवस मिळत असल्यानं कमीच डबल हेडर सामने होतील. सात आठवड्यांच्या या कालावधीत आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आम्ही पाचच डबल हेडर खेळवू. त्यामुळे सरावासाठी खेळाडू महिनाभर आधी म्हणजेच 20 ऑगस्टला यूएईला रवाना होतील.'' (IPL set to start on September 19, final on November 8)
बीसीसीआयचे काही अधिकारी ‘एमिरेटस्’ आणि ‘इत्तेहाद’ या विमान कंपनीसोबत चर्चा करत आहेत. ऑगस्ट महिन्यात खेळाडूंना भारत ते युएई प्रवास करायचा असेल तर विमानांचे बुकिंग व इतर गोष्टींवर काम सुरू झाल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले. दिल्ली, मुंबई, कोलकाता अशा विविध आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खेळाडूंना युएईमध्ये न्यावे लागेल. यासाठी नेमकी काय तयारी करावी लागेल, याचा अंदाज घेतला जात आहे.
खेळाडूंव्यतिरिक्त बीसीसीआयचे काही अधिकारी दुबई, शारजा आणि अबू धाबी येथे तयारी कशी सुरू आहे, याचा आढावा घेणार आहेत. ‘आयोजनाच्या बाबतीत आयपीएलची वेगळी ख्याती आहे. त्यामुळे यंदा युएईमध्ये स्पर्धा आयोजित होत असल्यामुळे कोणतीही उणीव राहू नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.