मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हे संघासोबत संयुक्त अरब अमिराती (यूएई)त दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सुर्यकुमार आणि त्याची पत्नी देविका ही पण युएईसाठी टीमसोबत रवाना झाली आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स संघही दुबईत दाखल झालेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ पाचवे आयपीएल जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिक पांड्या बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे आणि त्याच्याकडून तुफान फटकेबाजीची सर्वांना अपेक्षा आहे. त्यात संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडूही वेळेत युएईला पोहोचणार असल्यानं मुंबईचे पारडे आतापासूनच जड मानले जात आहे. असे असताना त्यांचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगा सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची बातमी समोर येत आहे. मलिंगा सुरुवातीचे काही सामने मुकणार आहे. श्रीलंकेचा 36 वर्षीय गोलंदाज वैयक्तिक कारणास्तव सुरुवातीच्या सामन्यांसाठी यूएईत दाखल होऊ शकणार नाही.
मुंबई इंडियन्सने
आयपीएल 2020च्या लिलावात ख्रिस लीन ( 2 कोटी), नॅथन कोल्टर नील ( 8 कोटी), सौरभ तिवारी ( 50 लाख), मोहसीन खान ( 20 लाख), दिग्विजय देशमुख ( 20 लाख) आणि प्रिंस बलवंत राय ( 20 लाख) यांना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ
रोहित शर्मा, हार्दिक शर्मा, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.
Web Title: IPL 2020 : The Sharma family has checked-in, Rohit, Ritika and samaira in Dubai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.