मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हे संघासोबत संयुक्त अरब अमिराती (यूएई)त दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सुर्यकुमार आणि त्याची पत्नी देविका ही पण युएईसाठी टीमसोबत रवाना झाली आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स संघही दुबईत दाखल झालेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ पाचवे आयपीएल जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिक पांड्या बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे आणि त्याच्याकडून तुफान फटकेबाजीची सर्वांना अपेक्षा आहे. त्यात संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडूही वेळेत युएईला पोहोचणार असल्यानं मुंबईचे पारडे आतापासूनच जड मानले जात आहे. असे असताना त्यांचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगा सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची बातमी समोर येत आहे. मलिंगा सुरुवातीचे काही सामने मुकणार आहे. श्रीलंकेचा 36 वर्षीय गोलंदाज वैयक्तिक कारणास्तव सुरुवातीच्या सामन्यांसाठी यूएईत दाखल होऊ शकणार नाही.