IPL 2020 : मुंबई इंडिन्सचा फलंदाज आता कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमाची मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सच्या माजी कर्णधार ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 02:34 PM2019-11-15T14:34:52+5:302019-11-15T14:35:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Siddhesh Lad traded from Mumbai Indians to Kolkata Knight Riders ahead of new IPL season | IPL 2020 : मुंबई इंडिन्सचा फलंदाज आता कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार

IPL 2020 : मुंबई इंडिन्सचा फलंदाज आता कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमाची मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सच्या माजी कर्णधार अजिंक्य रहाणेला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. शिवाय मुंबई इंडियन्सनेही ट्रेंट बोल्टला आपलेसे केले आहे. आयपीएल 2020च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. तत्पूर्वी ट्रेड ( अदलाबदली) करून संघ त्यांना हवा तो खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल करून घेत आहेत. आतापर्यंत दिल्लीनं सर्वाधिक खेळाडूंची अदलाबदल केली आहे. मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू आता कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार आहे.


मुंबई इंडियन्सनं फलंदाज सिद्धेश लाडला रिलिज केले असून तो आता कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य झाला आहे. 2015मध्ये सिद्धेशला मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले, परंतु त्याला पुरेशी संधी दिली गेली नाही. मागील सत्रात त्यानं पहिला आयपीएल सामना खेळला.''मुंबईचा फलंदाज सिद्धेश लाड आता कोलकाता संघाकडून खेळणार आहे,'' अशी माहिती आयपीएलच्या वेबसाईटवरून देण्यात आली. 

आतापर्यंत यांची झाली अदलाबदली

  • मयांक मार्कंडे (1.4 कोटी) मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतले
  • दिल्ली कॅपिटल्सचा शेर्फान रुथरफोर्ड ( 6.2 कोटी) मुंबई इंडियन्सकडून खेळणार
  • किंग्ज इलेव्हन पंजाबचा आर अश्विन ( 7.6 कोटी) पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार
  • दिल्ली कॅपिटल्सचा जगदीशा सुचिथ ( 20 लाख ) किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात
  • दिल्ल कॅपिटल्सचा ट्रेंट बोल्ट ( 2.2 कोटी) मुंबई इंडियन्सच्या संघात
  • राजस्थान रॉयल्सचा  कृष्णप्पा गौवथम ( 6.2 कोटी) किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार
  • किंग्ज इलेव्हन पंजाबचा अंकित रजपूत ( 3 कोटी) राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात
  • राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य रहाणे आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे

Web Title: IPL 2020 : Siddhesh Lad traded from Mumbai Indians to Kolkata Knight Riders ahead of new IPL season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.