‘मी सांघिक खेळाडू आहे. कर्णधार आणि कोचने आखलेल्या रणनीतीवर शंका घेणे माझे काम नाही. या निर्णयाला माझा पाठिंबा असतो. खेळात असे घडतेच. यशस्वी संघ असेच काम करतो. किंग्ज पंजाबविरुद्ध आरसीबीने फलंदाजीचा निर्णय घेतला. मी स्वाभाविकपणे चौथ्या स्थानावर खेळायचो. सहाव्या षटकात ६२ धावात दुसरा गडी बाद झाला त्यावेळी मैदानाकडे जाणारा रस्ता क्रॉस करणे सुरू केले होते.
पण कर्णधार आणि कोच यांच्या निर्णयानुसार मला थांबण्याचे आदेश मिळाले. आम्हाला पंजाबच्या दोन लेगस्पिनरपुढे डावे उजवे संयोजन राखायचे होते. हा योग्य निर्णय म्हणावा लागेल. जगातील अनेक संघ लेगस्पिनरपुढे डावखुऱ्या फलंदाजाला खेळविण्यास प्राधान्य देतात. मी या निर्णयावर आक्षेप घेणार नाही किंवा समस्या उभी करणार नाही.
ख्रिस मॉरिसच्या आक्रमकतेमुळे आरसीबीने २० षटकात ६ बाद १७१ अशी मजल गाठली. शारजाहच्या मंद खेळपट्टीवर या धावा कमी होत्या. राहुल, मयांक आणि गेल या सर्वांनी लक्ष्य गाठण्यात योगदान दिले. अखेरच्या षटकात रोमांचकतेत पंजाबने दोन गुण मिळवले. गुणतालिकेत पंजाबची जी स्थिती आहे, त्याहून हा संघ कैकपटींनी चांगला आहे. सलग पाच ते सहा सामने जिंकण्याचा ‘दम’ या संघात आहे. अनपेक्षितपणे साजरे होणारे विजय आयपीएलला रोमहर्षक बनवतात.
आरसीबीला निराशादायी पराभवातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला नव्याने मेहनत घ्यावी लागेल. शनिवारी राजस्थानविरुद्ध होणाºया सामन्यात लय मिळवावी लागेल. माझ्याबाबत विचाराल तर संघाच्या गरजेनुसार कुठल्याही स्थानावर खेळण्यास तयार असतो. विजयात योगदान देणे मला आवडते. म्हणून डिव्हिलियर्सच्या फलंदाजीचा क्रम बदललाएबी डिव्हिलियर्सला फलंदाजीसाठी तळाच्या स्थानावर पाठविण्याच्या आरसीबीच्या निर्णयावर पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर टीका होत आहे. यावर कर्णधार विराट कोहलीने स्पष्टीकरण दिले. ‘ही ठरलेली रणनीती होती, मात्र पंजाबविरुद्ध ती फसली,’अशी कबुली कोहलीने दिली आहे.
केकेआरविरुद्ध ३३ चेंडूत ७३ धावा ठोकणाºया एबीला पंजाबविरुद्ध चौथ्या ऐवजी सहाव्या स्थानावर पाठविण्यात आले. वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांना आधी संधी देण्यात आली. हे डावपेच यशस्वी ठरू शकले नाहीत, मात्र गोलंदाजांनी १७१ धावांचा बचाव करायला हवा होता, असे मत कर्णधाराने व्यक्त केले. फलंदाजीदरम्यान डाव्या आणि उजव्या फलंदाजांचे संयोजन रहावे असे माझे मत होते. दोन लेगस्पिनरविरुद्ध हे आवश्यक होते. मात्र मनाप्रमाणे घडत नाही असे सांगून सामना १८ व्या षटकात संपायला हवा होता, त्यासाठी पंजाबने अखेरच्या चेंडूपर्यंत लढा दिला याबद्दल कोहलीने आश्चर्य व्यक्त केले. पंजाबच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करीत प्रतिस्पर्धी संघ उत्तम स्थितीत होता, असे कोहलीने सांगितले.