Join us  

IPL 2020 : ...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण

MI vs RCB Latest News : ९९ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी का पाठवले नाही, अशी विचारणा क्रिकेट समीक्षक आणि क्रिकेटप्रेंमींकडून करण्यात येत आहे.

By बाळकृष्ण परब | Published: September 29, 2020 10:37 AM

Open in App
ठळक मुद्देइशान किशनच्या धडाकेबाज खेळीमुळेच आमचे सामन्यात पुनरागमन झालेमात्र मुंबईचा डाव संपल्यावर इशान थकल्यासारख्या वाटत होताआयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते

दुबई - आय़पीएलमध्ये काल रात्री झालेल्या जबदरस्त लढतीत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रोहित शर्माच्यामुंबई इंडियन्सवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. अत्यंत अटीतटीची झालेली ही लढत सामन्यातील शेवटच्या चेंडूवर कायरन पोलार्डने चौकार ठोकल्याने टाय झाली होती. मात्र सुपर ओव्हरमध्ये अपेक्षित कामगिरी करता न आल्याने मुंबईला पराभूव व्हावे लागले. दरम्यान, या सामन्यात ९९ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी का पाठवले नाही, अशी विचारणा क्रिकेट समीक्षक आणि क्रिकेटप्रेंमींकडून करण्यात येत आहे. आता या सवालाला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने उत्तर दिले आहे.सामना संपल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देताना रोहित शर्मा म्हणाला की, इशान किशनच्या धडाकेबाज खेळीमुळेच आमचे सामन्यात पुनरागमन झाले. कायरन पोलार्डने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. मात्र मुंबईचा डाव संपल्यावर इशान थकल्यासारख्या वाटत होता. तसेच त्याच्यामध्ये स्फूर्तीसुद्धा दिसून येत नव्हती. त्यामुळे आम्ही सुपर ओव्हरमध्ये त्याला फलंदाजीसाठी पाठवले नाही.९९ धावांची खेळी केल्यावर इशान किशन हा थकल्यासारखा वाटत होता. त्याला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवावे, असे आम्हाला वाटत होते. मात्र त्याच्यामध्ये फलंदाजीची स्फूर्ती दिसून येत नव्हती. हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या क्षमतेवर आमचा विश्वास होता. मात्र या लढतीत तो यशस्वी होऊ शकला नाही, असे रोहित शर्माने सांगितले.२०२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आमची सुरुवात चांगली झाली नाही. आमच्याकडे भक्कम फलंदाजी आहे ज्याच्या जोरावर आम्ही हे आव्हान पार करू असे मला वाटत होते. मात्र पहिल्या ६-७ षटकांत आम्हाला सूर मिळू शकला नाही. जोपर्यंत पोलार्ड खेळपट्टीवर होता तोपर्यंत आम्हाला सामन्यात विजय मिळवण्याची आशा होती. पोलार्ड खेळपट्टीवर असताना काहीही होऊ शकते. दुसरीकडे इशान चेंडूंना चांगल्याप्रकारे हिट करत होता. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास की आम्ही या आव्हानाचा पाठलाग करू शकतो.आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ३ बाद २०१ धावा फटकावत मुंबईसमोर २०२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत पाच बाद २०१ धावांपर्यंत मजल मारल्याने सामना टाय झाला होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मुंबईला केवळ ७ धावा जमवता आल्या. या आव्हानाचा बंगळुरूने सुपर ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर सहजपणे पाठलाग केला.

 

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोररोहित शर्मा